नाशिक जिल्ह्यात कोरोनाचे ११०३ तर शहरात ८५७ नवे रुग्ण : ऍक्टिव्ह रुग्णसंख्या ३३५०
मागील २४ तासात : जिल्ह्यात ११९ कोरोना मुक्त : ५९ कोरोनाचे संशयित : रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०५ %
नाशिक – आज नाशिक जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत आज मोठी वाढ झालेली आहे. जिल्ह्यात कोरोनाचे एकूण ११०३ कोरोना बाधित रुग्ण आढळले.त्यापैकी नाशिक शहरात नव्या रुग्णांची संख्या ८५७ झाली तर जिल्ह्यात आज ११९ जण कोरोना मुक्त असून आज जिल्ह्यात कोरोनामुळे आज ० जणांचा मृत्यू झाला आहे. आज ५३७० जणांचे कोरोनाचे अहवाल येणे प्रतीक्षेत आहे.
सायंकाळी आलेल्या अहवालात आज नाशिक शहरात ८५७ तर ग्रामीण भागात २०१ मालेगाव मनपा विभागात ०६ तर बाह्य ३९ अशा नव्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. नाशिक शहरात हा रेट ९७.१३ झाला टक्के आहे.सद्य स्थितीत जिल्ह्यात एकूण ३५५० पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असून शहरात एकूण २७३८ जण उपचार घेत आहेत. अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालायाचे नोडल अधिकारी डॉ.अनंत पवार यांनी दिली.
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी –
आज रोजी कळवण्यात आलेले मृत्यू:-०
नाशिक महानगरपालिका- ००
मालेगाव महानगरपालिका-००
नाशिक ग्रामीण-००
जिल्हा बाह्य-००
नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – ८७६३
नाशिक शहरात एकूण मृत्यू – ४०२९
नाशिक जिल्ह्यात रुग्णालयात दाखल झालेले कोरोना संशयित(सायंकाळी ०७:००वा पर्यंत)
१) जिल्हा रुग्णालय नाशिक – ०८
२)नाशिक मनपा रुग्णालये, डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – ३६
३)डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय,नाशिक डी. सी. एच. सी. / सी.सी.सी- ००
४)मनपा मालेगाव रुग्णालये ,डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – ०६
५)नाशिक ग्रामीण डी.सी.एच.. / सी.सी.सी./गृह विलगीकरण –०९
जिल्ह्यातील कोरोनाचे एकूण प्रलंबित अहवाल – ५३७०
नाशिक जिल्हा ,शहरात कोणकोणत्या परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले जाणून घ्या
(कृपया खालील लिंक वर क्लीक करा)