कुशीनगर – उत्तर प्रदेशातील कुशीनगरमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. हळदीचा कार्यक्रम पाहण्यासाठी विहिरीच्या जाळीवर उभं राहणं जीवावर बेतलं. विहिरींची लोखंडी जाळी तुटल्यानं १३ महिलांचा मृत्यू झाला आहे.
उत्तर प्रदेशातील कुशीनगर जिल्ह्यातील नेबुआ नौरंगिया पोलीस स्टेशन हद्दीतील नौरंगिया गावात बुधवारी रात्री उशिरा ही दुर्घटना घडली आहे. दुर्घटनेमुळे विवाह समारंभावर शोककळा पसरली आहे.दरम्यान, मृतांच्या नातेवाईकांना चार लाख रुपयांची भरपाई दिली जाणार आहे.
१२ पेक्षा अधिक लोक गंभीर जखमी असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विहिरीत आणखी लोक असल्याची भीती असल्याने रात्री उशिरापर्यंत बचावकार्य सुरूच होते. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री हळदीच्या मडक्याचे विधी सुरू असताना अचानक विहिरीवर बसवलेली जाळी तुटल्याने २५ हून अधिक महिला, मुली व लहान मुले विहिरीत पडली. मृतांपैकी दोघांची ओळख पटू शकली नाही. या घटनेनंतर गावात शोककळा पसरली आहे.
मुख्यमंत्री योगी यांनी या दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्र्यांनी तातडीने मदत करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ घटनास्थळी पोहोचून बचाव आणि मदतकार्य सुरू केले.
UP | 13 women have died. The incident occurred last night at around 8.30 pm in the Nebua Naurangia, Kushinagar. The incident happened during a wedding program wherein some people were sitting on a slab of a well & due to heavy load,the slab broke: Akhil Kumar, ADG, Gorakhpur Zone pic.twitter.com/VaQ8Sskjl2
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) February 17, 2022