मेनरोड येथील गणपती मंदिरात १३२ व्या माघी गणेश जन्मोत्सवाला सुरुवात

२२ ते २६ जानेवारी पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन

0

नाशिक,२३ जानेवारी २०२३ – मेनरोड येथील गणपती मंदिरात १३२ व्या माघी गणेश जन्मोत्सवाला काल पासून सुरुवात झाली त्यानिमित्ताने २२ ते २६ जानेवारी पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांसोबत विशेष संगीत समारोहाचे आयोजन केले आहे.

काल पासून या उत्सवाची सुरुवात झाली काल सकाळी ९ ३० वा श्री गणेश योगाने या जन्मोत्सवाला सुरुवात झाली असून आज सोमवार दि. २३ जानेवारी रोजी सायं ७ वा पं. प्रभाकर श्रीकृष्णशास्त्री गोडशे आणि ब्रह्मवृंद वेदोक्त मंत्रजागर करतील तर रात्री ९ ३० वा श्री गणेश भक्त संगीत सेवा श्री चरणी रुजू होईल.

मंगळवार,दि. २४ जानेवारी रोजी रात्री ९ ३० वा नाशिकचे युवा सतारवादक प्रतीक पंडित यांच्या सतारवादनाची मैफिल होईल त्यांना अद्वय पवार तबलासंगत करतील.बुधवार, दि. २५ जानेवारी रोजी सकाळी ११ वा ह.भ.प. दिगंबर महाराज काशीकर यांचे श्रीगणेश जन्माचे कीर्तन होईल आणि त्यानंतर दुपारी १२ ३० वा श्री जन्मसोहळा साजरा केला जाईल.

उत्सवाची सांगता गुरुवार दि. २६ जानेवारी रोजी रात्री ९ ३० वा भक्ती पवार (जालना) यांच्या गायनाने होईल. त्यांना सुजीत काळे (तबला) आणि संस्कार जानोरकर (संवादिनी) साथ करतील.
संपूर्ण उत्सव हा सर्वांसाठी खुला असून नाशिककर भाविक आणि संगीत प्रेमींनी कार्यक्रमांचा आस्वाद घ्यावा असे आवाहन विश्वस्त मंडळाने केले आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.