मुंबई, दि.१३ जानेवारी २०२३ – १९ व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेत नाशिक केंद्रातून सप्तरंग थिएटर्स, अहमदनगर या संस्थेच्या अजब लोठ्यांची महान गोष्ट या नाटकाला प्रथम पारितोषिक तसेच समिज्ञा बहुउद्देशिय संस्था, नाशिक या संस्थेच्या बदला या नाटकास द्वितीय पारितोषिक आणि आत्मा मालिक, कोकमठाण, या संस्थेच्या आम्ही ध्रुव उद्याचे या नाटकाला तृतीय पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालनालयाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली आहे.
या तिन्ही बालनाटकांची अंतिम फेरीसाठीही निवड करण्यात आली आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे नाशिक केंद्रावरील अन्य निकाल पुढीलप्रमाणे- दिग्दर्शन प्रथम पारितोषिक आरती अकोलकर (नाटक- अजब लोट्यांची महान गोष्ट), द्वितीय पारितोषिक पुनम पाटील (नाटक- बदला), तृतीय पारितोषिक सुजीत जोशी ( अद्भूत बाग) प्रकाश योजना प्रथम पारितोषिक चेतन ढवळे (नाटक बदला), द्वितीय पारितोषिक गणेश लिमकर (नाटक-एक रात्र गडावर), नेपथ्य : प्रथम पारितोषिक ऋषिकेश पाटील (नाटक- झुंझार), द्वितीय पारितोषिक प्रविण नेरके (नाटक- सुखी सदन्याचा शोध), रंगभूषा : प्रथम पारितोषिक दिपाली अडगटला (नाटक एक रात्र गडावर), द्वितीय पारितोषिक माणिक कानडे (नाटक- चिमटा) उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक श्लोक नेरकर (नाटक-बदला) व गायत्री रोहोकले (नाटक- अजब लोट्यांची महान गोष्ट), अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे अनुजा कुलाळ (नाटक हे जीवन सुंदर आहे). निकिता वरखडे (नाटक- दप्तर), आर्या देखणे (नाटक अजब लोट्ठ्यांची महान गोष्ट), ईश्वरी बकरे (नाटक-तहानलेली), मनस्वी लगड (नाटक-सुखी सदऱ्याचा शोध), सम्यक सुराणा (नाटक- अजब लोट्यांची महान गोष्ट), आर्यन बोलीज (नाटक- बदला), सौरभ क्षिरसागर (नाटक- अभिप्राय), भार्गव जोशी (नाटक- झुंझार), वीर दिक्षित (नाटक- अद्भूत बाग).
दि. ०३ जानेवारी २०२३ ते ०९ जानेवारी २०२३ या कालावधीत माऊली सभागृह, अहमदनगर व परशुराम साईखेडकर नाटयगृह, नाशिक येथे अतिशय जल्लोषात झालेल्या या स्पर्धेत एकूण ३० नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून श्री. शंकर घोरपडे, श्री. गणेश शिंदे आणि श्रीमती मंजुषा जोशी यांनी काम पाहिले. सर्व पारितोषिक विजेत्यांचे सांस्कृतिक कार्य मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांनी अभिनंदन केले आहे.