२० वी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेत नाशिक केंद्रातून “व्ही.सी.आर” नाटक प्रथम

0

मुंबई, दि. १२ जानेवारी २०२४ – विसावी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेत नाशिक केंद्रातून सप्तरंग, अहमदनगर या संस्थेच्या व्ही.सी.आर या नाटकाला प्रथम पारितोषिक तसेच आनंद तरंग फाऊंडेशन, वाघेरे या संस्थेच्या गण्याचा देव मनाचा देव या नाटकास द्वितीय पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालक श्री. बिभीषण चवरे यांनी आज एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली आहे. या दोन्ही बालनाटकांची अंतिम फेरीसाठीही निवड करण्यात आली आहे.

सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे नाशिक+अहमदनगर केंद्रावरील अन्य निकाल पुढीलप्रमाणे-

दिग्दर्शनः प्रथम पारितोषिक योगेश निळे (नाटक-फुलराणी), द्वितीय पारितोषिक पूनम पाटील (नाटक- या काळोखाचा रंग कोणता), प्रकाश योजना प्रथम पारितोषिक प्रतिमा शेंडे (नाटक-या काळोखाचा रंग कोणता), द्वितीय पारितोषिक चेतन ढवळे (नाटक-गण्याचा देव मन्याचा देव), नेपथ्य: प्रथम पारितोषिक दीपक (नाटक-व्ही.सी.आर.), द्वितीय पारितोषिक हर्ष कुलकर्णी (नाटक-ताटी उघडा…), रंगभूषा प्रथम पारितोषिक वैशाली रहाणे (नाटक-चल गं बशी भरा भरा), द्वितीय पारितोषिक मैथिली जोशी (नाटक-फुलपाखरु) उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक साईराज सरडे (नाटक- व्ही.सी.आर.) व समीक्षा चव्हाण (नाटक-फुलराणी), अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे स्वरा शिरसाट (नाटक- गण्याचा देव मनाचा देव), आत्मजा चिंचोलळकर (नाटक-बाजार), सान्वी घुगे (नाटक-चल ग बशी भरा भरा), ओवी गरुळे (नाटक-आटापिटा), अनुष्का पेरणे (नाटक-फुलराणी), ईशान कोयटे (नाटक-एलियन्स द ग्रेट), संकर्षण धर्माधिकारी (नाटक-व्ही.सी.आर.), अंशुल वरखेडे (नाटक-WE चार), सौरभ क्षिरसागर (नाटक-गण्याचा देव मनाचा देव), आर्यन बोळीज (नाटक-या काळोखाचा रंग कोणता).

दि.०३ जानेवारी २०२४ ते ०८ जानेवारी २०२४ या कालावधीत माऊली सांस्कृतिक सभागृह,अहमदनगर व परशुराम साईखेडकर नाट्यगृह, नाशिक येथे अतिशय जल्लोषात झालेल्या या स्पर्धेत एकूण २१ नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून श्रीमती अनघा वैद्य, श्री. विश्वनाथ निळे आणि श्री. प्रविण अहिरे यांनी काम पाहिले.

सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव श्री. विकास खारगे यांनी विजेत्यांचे अभिनंदन केलेले आहे.सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रथम व द्वितीय आलेल्या बालनाटकाच्या संघाचे तसेच इतर पारितोषिक प्राप्त कलाकारांचे अभिनंदन केले असून भविष्यातही या संघांनी व कलाकारांनी सर्वोत्तम कामगिरी करावी,अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.