ग्रंथ तुमच्या दारी योजनेतून २१ ग्रंथ पेट्या डॅलस येथे रवाना

मराठी वाचक जेथे...ग्रंथ तुमच्या दारी तेथे

0

नाशिक – जगभरात गेली १३ वर्षे सतत विस्तारत असलेल्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या ग्रंथ तुमच्या दारी या दर्जेदार मराठी ग्रंथसंपदा वाचनासाठी उपलब्ध करून देणाऱ्या वाचकप्रिय योजनेमुळे अडीच कोटींपेक्षा जास्त रुपयांची पुस्तके वाचनासाठी भारत आणि भारताबाहेर १५ देशात फिरत्या ग्रंथ पेट्यांच्या स्वरूपात आहेत. आता हर्षद खाडिलकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रंथ तुमच्या दारी योजना डॅलस येथे मराठी वाचकांना उपलब्ध होणार आहे. त्यासाठी २१ ग्रंथ पेट्या डॅलस येथे रवाना झाल्या आहेत.डॅलस येथील एकूण १७ मराठी कुटुंबांनी योजनेसाठी देणगी देऊन मोलाचे योगदान दिले आहे डॅलस येथील श्री पद्माकर खडतरे ह्या मूळच्या नाशिकच्या तरूणाची पण मोलाची मदत आहे , जून महिन्यात त्यांच्या नाशिक भेटीत त्यांनी कुसुमाग्रज स्मारक येथे भेट देऊन ग्रंथ तुमच्या दारी योजनेचे प्रवर्तक विनायक रानडे यांच्याकडून योजना समजून घेतली , त्यांना ग्रंथ तुमच्या दारी योजना खूपच भावली , त्यांनी त्यातील सर्व बारकावे आणि वाचनानंदासाठी किती उत्तमोत्तम पुस्तके उपलब्ध केली जातात हे समजून घेतले ,

नाशिकच्या ग्रंथ तुमच्या दारी परिवारातील श्री मुकुंद खाडिलकर यांचे पुतणे श्री हर्षद खाडिलकर हे डॅलस येथे अनेक वर्षे वास्तव्यास आहेत,तेथील सांस्कृतिक,साहित्यिक कार्यक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग असतो ,त्यांना वाचनाची आवड आहेच पण डॅलस मधील सर्वांना मराठी दर्जेदार पुस्तके वाचनासाठी उपलब्ध व्हावीत म्हणून त्यांनी समन्वयक म्हणून सक्रिय पुढाकार घेतला , त्यांना तेव्हढ्याच समर्थपणे साथ लाभली ती परिमल गांधी यांची .नाशिकचे यशस्वी उद्योजक तसेच शैक्षणिक,सामाजिक,सांस्कृतिक क्षेत्रात मोलाची कामगिरी करणारे कौस्तुभ मेहता यांची सख्खी बहीण म्हणजे परिमल गांधी.म्हसरूळ येथील कौस्तुभ मेहता यांचे आई,वडील,भाऊ वहिनी,पत्नी,मुलं,पुतणे असे मोठ्ठे एकत्र कुटुंब,हे संपूर्ण कुटुंब मराठी साहित्याचे वाचक असून ग्रंथ तुमच्या दारी योजनेचा भक्कम आधार आहेत ,बाल ग्रंथालय, तरुणाई,माझं ग्रंथालय अशा सर्व उपक्रमात हे वाचक कुटुंब सक्रिय सहभागी आहे,परिमल गांधी आधी पुण्यात वास्तव्यास होत्या तेथेही त्या ग्रंथ तुमच्या दारी योजनेच्या सक्रिय वाचक होत्याच,नंतर त्या डॅलस येथे गेल्या आणि हर्षद खाडिलकर यांच्या झुंझार नेतृत्वाखाली ग्रंथ तुमच्या दारी योजना डॅलस येथे सुरू करण्यासाठी भक्कम साथ देत आहेत ,

२१ ग्रंथ पेट्यांनी डॅलस येथे ग्रंथ तुमच्या दारी योजनेचा शुभारंभ होत आहे

एका ग्रंथ पेटीत २५ पुस्तक आहेत , प्रत्येक पेटीतील पुस्तक वेगळी असतात , विविध भागात या पेट्या वाचक कुटुंबाला तीन महिन्यासाठी उपलब्ध होतात , दर 3 महिन्यांनी पेट्या परस्परांच्या मध्ये बदलत्या ठेवल्यामुळे सर्वाना मोठ्या प्रमाणात दर्जेदार मराठी ग्रंथसंपदा वाचनासाठी उपलब्ध होत राहाते भविष्यात जश्या ग्रंथ पेट्या वाढत जातात तेवढी विविध प्रकारची जास्तीत जास्त पुस्तक आपल्या वाचकांना उपलब्ध होतात

२ कोटी ५० लाख रुपयांची ग्रंथ संपदा
महाराष्ट्र , गोवा , गुजराथ , दिल्ली, सिल्व्हास, तामिळनाडू ,कर्नाटक तसेच तसेच भारताबाहेर दुबई , नेदरलँड , टोकियो , अटलांटा , स्वित्झरलॅन्ड , ऑस्ट्रेलिया , फिनलँड , वॉशिंग्टन DC , मॉरिशस ,ओमान,मस्कत,सॅनफ्रान्सिस्को ,बे एरिया ,लंडन ,श्रीलंका ,ब्रिस्बेन ,टोरंटो , हुस्टन , डॅलस . . .

वाचन संस्कृतीच्या समृद्धीसाठी प्रत्येकाने त्याच्या वाढदिवसानिमित्त पुस्तक खरेदीसाठी कुसुमाग्रज प्रतिष्ठानला यथा योग्य देणगी द्यावी या आवाहनाला उस्फुर्त तसेच उदंड प्रतिसाद मिळाला.

वाढदिवस , एकसष्ठी , पंच्याहत्तरी , सहस्त्र चंद्र दर्शन तसेच दिवंगत आप्तेष्टांच्या स्मरणार्थ अशा अनेक प्रसंगानुरूप मिळालेल्या भारतात ८० जी अंतर्गत आयकरात सूट असलेल्या देणग्यांमुळेअसंख्य मराठी वाचकांना त्यांच्या निवासी भागात , कार्यालयात , दवाखान्यात अशा त्यांच्या जवळपासच्या भागात वाचनासाठी विनामोबदला विनासायास उपलब्ध होत आहेत .

जगभरात आज मराठी माणूस नाही अशी भूमी नाही म्हणजेच ग्रंथ तुमच्या दारी योजनेच्या भरारीला आता आकाशाला गवसणी घालण्यास कोणतीच बंधने नाहीत, जिथे म्हणून मराठी शब्द ,मराठी भाषा आहे ,मराठी माणूस आहे तिथे तिथे आमची योजना जावी अशी आमची इछा आहे.असं ग्रंथ तुमच्या दारी योजनेचे प्रवर्तक यांनी सांगितले ग्रंथ तुमच्या दारी योजनेतील सहभागी सर्व वाचक,समन्वयक,संस्था,देणगीदार,हितचिंतक यांच्या सक्रिय सहभागानेच हा विस्तार होत आहे असं हि रानडे म्हणाले ,

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.