४४ वर्षांचा ‘मुकद्दर का सिकंदर’

दीपक ठाकूर 

0

दीपक ठाकूर 
मुकद्दर का सिकंदर ह्या चित्रपटाला  रिलीज होऊन काल २७ ऑक्टोबर रोजी बरोबर ४४ वर्षे झाली. खरं तर दिग्दर्शक प्रकाश मेहरा यांनी अमिताभ बच्चन, हेमा मालिनी आणि शर्मिला टागोर यांच्यासोबत देवदास चा रिमेक बनवण्याची योजना आखली होती, पण सर्व पूर्व तयारी झाल्यावर त्यांनी आपला विचार बदलला आणि त्याऐवजी  कादर खान, विजय कौल आणि लक्ष्मीकांत शर्मा ह्या आपल्या  लेखकांना बरोबर घेऊन देवदासवर बेतलेली परंतु एक आधुनिक टच असलेली कथा विकसित केली. अमिताभच्या सारख्या स्टार च्या प्रतिमेसाठी ही एक सर्वांगसुंदर भूमिका त्यांनी लिहून काढली.

सिकंदरच्या भूमिकेत त्याने अविस्मरणीय कामगिरी करत पूर्ण जीव ओतून  काम केले आहे.तुमच्या एक लक्षात आलं असेलच की ह्या चित्रपटात  भावनाप्रधान संवाद, रोमान्स, ऍक्शन आणि अगदी सहज विनोदही अव्वल दर्जाचे आहेत! नशेच्या दृश्यांमध्ये अमिताभ विलक्षण  चमकतो. अमिताभ आणि विनोद खन्ना यांच्या कॉम्बोसोबतचा हा शेवटचा चित्रपट होता. या चित्रपटात दोघांची जोडी ही छान जमली होती. आज ही हा चित्रपट बघताना त्यांची मैत्री अगदी निखळ वाटते. रेखा एका छोट्या भूमिकेत इतकी भाव खाऊन जाते की आपण तिच्या अक्षरशः प्रेमात पडतो .जेव्हा विनोद तिला अमिताभला भेटणे थांबवण्यासाठी लाखांची ऑफर देतो, तेव्हा तिने उत्तर देते की मी त्याचा फोटोही लाखात  विकणार नाही ,हा माझ्या मते एक उत्कृष्ठ प्रसंग चित्रित केला गेला होता.तीच्या डोळ्यात आपल्याला फक्त अमिताभ आणि त्याच्यावर तिचे असलेलं प्रेमच दिसत असतं. ती कदाचित खऱ्या आणि रील लाइफमध्ये ही त्याच्यावर प्रेम करत होती ! अमजद खानने त्यांच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम भूमिकांपैकी एक आणि कदाचित पहिल्यांदाच रोमँटिक भूमिका केली कारण तो पूर्ण चित्रपटात रेखाच्या प्रेमात पूर्ण पणे बुडलेलाअसतो.

अमिताभचा साईडकिक प्यारेलाल म्हणून राम सेठी ने खूप छान साथ दिली  होती. असरानी यांच्या अनुपलब्धतेमुळे त्यांना ही भूमिका मिळाली  आणि त्यांनी त्या भूमिकेचे सोने केले.  मुकद्दर का सिकंदर हा अमिताभचा शोले नंतरचा पहिला सिनेमास्कोप चित्रपट होता आणि त्याच बरोबर १९७८ मधील सर्वात हिट चित्रपट होता ! माझ्या मते ७० च्या दशकातील हा तिसरा सर्वात मोठा हिट चित्रपट होता! १९७८ हे अमिताभसाठी अत्यंत यशस्वी वर्ष होते . राखी ह्या चित्रपटात खूपच सुंदर दिसली आहे.कादर खान ह्यांच्या संवादानी तर हा चित्रपट एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला. कल्याणजी आनंदजी ह्यांच्या संगीताने तर कहरच केला होता, अंजान आणि खुद्द प्रकाश मेहता ह्यांनी लिहिली एकसे बढकर एक गाणी त्यांनी पेश केली होती. आणी विशेष म्हणजे लता, किशोर, रफी, आशा, हेमलता अश्या सर्व दिगग्ज गायकांनी त्यातील गाण्यांना स्वरसाज  चढवला होता.एकुणच हा चित्रपट म्हणजे एक परिपूर्ण मेजवानीच तेव्हाही  होती आणि आजही आहे.
मोबाईल -९८२३३५१५०५

Deepak Thakur
दीपक ठाकूर,

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!