२० हजारांहून कमी किंमतीत 5G वर सेवेवर आधारित Realme Pad X टॅबलेटची भारतात विक्री

0

नवी दिल्ली – भारतात लवकरच 5G सेवा सुरु होणार आहे.भारतातील 5Gस्पेक्ट्रमच्या लिलावाची प्रक्रिया सध्या शेवटच्या टप्प्यात आहे. कोरोनाच्या काळात गेल्या २ वर्षात बहुतेक सर्वच कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम सुरु केलं असल्यामुळे मोबाईल, लॅपटॉपची प्रंचड प्रमाणात मागणी वाढलीहोती.दोन वर्षांपूर्वीपर्यंत, जिथे सॅमसंग आणि ऍपल टॅबलेट मार्केटमध्ये होते,आज Realme, Redmi, Lava सारख्या अनेक कंपन्यांनी त्यांचे टॅब्लेट बाजारात लॉन्च केले आहेत .

या दोन वर्षांत अनेकयापैकी बहुतेक टॅब्लेट हे 4G सपोर्टसह येतात.आता Realme ने अलीकडेच 5G सपोर्टसह आपला पहिला टॅबलेट Realme Pad X बाजारात लॉन्च केला आहे. Realme च्या या टॅबमध्ये ११ इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. Realme Pad X साठी स्मार्ट कीबोर्ड आणि रिअॅलिटी पेन्सिल देखील लॉन्च केले गेले आहेत. आज Realme Pad X ची पहिली विक्री झाली आहे.

या Realme Pad X ची किंमत १९,९९९ रुपये आहे. ही किंमत 64 GB स्टोरेज आणि 4 GB रॅम सह Wi-Fi व्हेरियंटची आहे. त्याच वेळी, 5G सपोर्ट असलेल्या मॉडेलची किंमत २५,९९९ रुपये आहे. टॅबच्या 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत २७,९९९ रुपये आहे. Realme Pad X टॅब ग्लेशियर ब्लू आणि ग्लोइंग ग्रे रंगांमध्ये ग्राहकांना खरेदी करता येऊ शकतो.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.