बिग बॉस मराठीच्या घरामधून रुचिरा जाधव बाहेर !

0

मुंबई  १३ नोव्हेंबर,२०२२ – बिग बॉस मराठीची या आठवड्यातील चावडी चांगलीच रंगली. शेतकरीच नवरा हवा मालिकेतील कलाकार रुचा गायकवाड, प्रदीप घुले आणि निर्माती श्वेता शिंदे बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्यांना भेटले. तर सदस्यांसोबत रंगला एक गेम ज्यात गद्दार कोण ? हे सदस्यांना सांगायचे होते ज्यात रुचिराने अपूर्वाला तर विकासने किरण माने यांना गद्दार ठरवले.

यावर किरण माने खूप दुखावले आणि त्याने स्वतःलाच गद्दार म्हणून टॅग दिला. तर यशश्रीने तेजस्विनीला ठरवले गद्दार. समृद्धीने अमृता धोंगडेला तर अक्षयने रोहितला गद्दार ठरवले. प्रसादने किरणला तर अमृता धोंगडेने प्रसादला गद्दार ठरवले. याचसोबत बिग बॉसच्या चावडीमध्ये VOOT चुगली बूथद्वारे आलेल्या चुगलीमुळे यशश्री अपूर्वा, अक्षय आणि अमृता देशमुख वर चांगलीच भडकली. ज्यामध्ये अमृता देशमुख चे म्हणणे होते त्यांनी यशश्रीला खूप आठवडे पोसलंय. यावर यशश्रीने तिचे स्पष्टीकरण त्यांना दिले.

Ruchira Jadhav out of Bigg Boss Marathi house!

VOOT आरोपी कोण मध्ये प्रसादला आरोपी ठरवले आणि शिक्षा देखील सुनावली. ज्यामध्ये प्रसादने अमृता देशमुखसोबत डान्स करावा असे सांगण्यात आले. आणि मग सगळ्यात कठीण क्षण आला जो कधीच येऊ नये हे घरातील प्रत्येक सदस्याला वाटत असते. प्रसाद आणि रुचिरा डेंजर झोनमध्ये आले. आणि रुचिरा जाधवला घर सोडून जावे लागले.

पुढच्या आठवड्यात कोण राहील ? कोण जाईल ? हे ठरवेल त्याचा गेम. कोण होईल कॅप्टन ? कोण होईल नॉमिनेट ? कोण होईल सेफ ? जाणून घेण्यासाठी बघत राहा बिग बॉस मराठी सोम ते शुक्र रात्री १० वा. आणि शनि – रवि रात्री ९.३० वा. कलर्स मराठीवर आणि कधीही VOOT वर.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!