आयमा इंडेक्सच्या माध्यमातून नाशकात ८५० कोटींची गुंतवणूक 

उद्योजकांचे प्रश्न सोडविण्याचे ना.भुजबळ यांचे आश्वासन

0

नाशिक-आयमातर्फे भरविण्यात आलेले औद्योगिक प्रदर्शन नाशिककरांसाठी लाभदायकच ठरले आहे. या माध्यमातून ८५० कोटीच्या गुंतवणुकीचे तीन प्रकल्प नाशकात येणार आणि रोजगार निर्मितीला चालना मिळणार हे शुभसंकेतच म्हणावे लागेल आणि त्यासाठी धनंजय बेळे आणि त्यांच्या टीमला खरोखरच  धन्यवाद दिले पाहिजेत,असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री ना.छगन भुजबळ यांनी केले.

डोंगरे वसतिगृह येथे असयोजित  ‘आयमा इंडेक्स २०२२ चे  उदघाटन करतांना  ना.भुजबळ  बोलत होते.व्यासपीठावर आ.डॉ. सुधीर तांबे, आ.सीमा हिरे,महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पाटील, एचएएलचे मुख्यकार्यकारी अधिकारी दिपेंदिव मैती,हिरानंदानी ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीधर नारायण,आयमा इंडेक्सचे चेअरमन धनंजय बेळे,आयमाचे अध्यक्ष निखिल पांचाळ,माजी अध्यक्ष वरूण तलवार,सेक्रेटरी ललित बुब, उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे,मनीष रावल, सूर्यभान नाईकवाडे,सुदर्शन डोंगरे, सेक्रेटरी योगिता आहेर,गोविंद झा, राजेंद्र कोठावदे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

उद्योजकांची प्रश्न सोडविण्यासाठी महाविकास आघाडी सरकार कटिबद्ध असून ते लवकरच सोडविले जातील.  मुंबई पुण्यानंतर उद्योगवाढीसाठी नाशकातच अनुकूल वातावरण असून येथे मोठ्याप्रमाणात उद्योग आले पाहिजेत.इतर शहरात काही चुकीची पावले पडली असतील तर नाशिकमध्ये त्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न व्हावा.असेही ना.भुजबळ यांनी पुढे नमूद केले.

नाशिकमध्ये पायाभूत सुविधांचा विकास करून उद्योगांना आवश्यक असे वातावरण निर्माण केले आहे. जानोरीला विमानतळ विकसित करण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून विकसित झालेले हे पाहिलेच उत्कृष्ट विमानतळ  आहे. पार्किंची सुविधा असल्याने याठिकाणी नाईट हाल्टसाठी विमाने यावीत अशी मागणी आहे,असेही ते म्हणाले, नाशिकला अतिशय चांगला हवामान लाभले आहे.महाराष्ट्रात अधिक उद्योग यावे यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. तसेच राज्यातील प्रकल्प इतरत्र जाणार नाही यादृष्टीनेही पावले उचलण्यात येत आहेत.कोरोनाचा प्रभाव संपला असून  विकास कामांचा अनुशेष भरून काढण्यासाठी शासन  प्रयत्न करीत आहे.उद्योजकांनीसुधा दोन वर्षांचा अनुशेष भरून काढावा असे आवाहनही त्यांनी केले.उद्योगक्षेत्र आणि समाज वेगळे राहूच शकत नाही.त्यामुळे समाजाचे हीत जोपासण्याचे कार्य करा असे  सांगतांनाच कोविड काळात आयमाने केलेल्या उपक्रमांबद्दल त्यांनी गौरवोद्गार काढले.

जिंदालचे  तनेशकुमार धिंग्रा यांनी गुंतवणुकी विषयी मनोगत व्यक्त केले. एचएएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी  डी.मैती यांनी एचएएल हे संरक्षण दलाचा कणा असल्याचे सांगितले.नाशकात गुंतवणुकीबाबत असलेले महत्त्व ही त्यांनी विशद केले. नाशकात कनेक्टिविटी आणि इतर पायाभूत सुविधा भक्कम असल्याचेही ते म्हणाले.महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सहआयुक्त अजित पाटील यांनी गुंतवणुकीबाबत देशात आणि महाराष्ट्रात जोरदार स्पर्धा सुरू आहे.असे असले तरी नाशकात गुंतवणुकीला निश्चितच चांगला वाव मिळेल असा आशावाद  व्यक्त केला. प्रदर्शनाचेचे चेअरमन धनंजय बेळे यांनी आपल्या भाषणात आयमाच्या कार्याची विस्तृत माहिती सादर केली.

नाशकात दर तीन वर्षांनी भरणाऱ्या या औद्योगिक कुंभमेळ्याचे वेगळेपणही त्यांनी उपस्थितांना पटवून दिले.नाशकात जास्तीत जास्त गुंतवणूक आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.मुंबई पुण्यानंतर नाशिक हेच उद्योगवाढीसाठी योग्य डेस्टिनेशन असल्याचे ते पुढे म्हणाले.उद्योगवाढीला चालना देण्यासाठी औद्योगिक विकास महामंडळाच्या सहकार्याने जिल्ह्यात अनेक ठिकाणी जागा संपादित करण्याचे काम सुरू आहे असे त्यांनी निदर्शनास आणले.येत्या काही दिवसांत आणखी काही परस्पर सामंजस्य करार होणार असल्याचे सुतोवाचही बेळे यांनी केले.स्वागत आयमाचे विद्यमान चेअरमन निखिल पांचाळ यांनी केले तर आभार  ललित बूब यांनी मानले.

हिरानंदानी ग्रीनबेस  ग्रुप नाशकात सहाशे कोटींची गुंतवणूक करणार आहे ॲडव्हान्स एंझाईम(सिन्नर)चे किशोर राठी यांनी शंभर कोटीची गुंतवणूक तर ज्योयस्टिक एढेसिव्ह कंपनीचे संचालक जयंत जोगळेकर यांनी अमेरिकन कंपनीबरोबर दीडशे कोटीचा करार केल्याचे सांगितले या सर्व गुंतवणूकदारांचा ना.भुजबळ यांच्या हस्ते यावेळी सत्कार करण्यात आला

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!