ओडिशात मोठा रेल्वे अपघात : कोरोमंडल एक्सप्रेसला मालगाडीची टक्कर 

0

भुवनेश्वर.दि.२ जून २०२३ –ओडिशामध्ये एक मोठा रेल्वे अपघात झाला आहे.बालासोरच्या बहनागा स्टेशनजवळ कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडीची समोरासमोर धडक झाली. ही टक्कर इतकी भीषण होती की,प्रवासी वाहतूक करणाऱ्या कोरोमंडल एक्स्प्रेसचे (१२८४१)१८ डबे रुळावरून घसरले.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,या अपघातात आतापर्यंत ३५० जण जखमी झाले असून ५० जणांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे.जखमींना सोरो सीएचसी,गोपाळपूर सीएचसी आणि खंटापाडा पीएचसीमध्ये दाखल करण्यात आले.शोध आणि बचाव कार्यासाठी पथके घटनास्थळी पोहोचली आहेत.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार या कोचमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवासी अडकले आहेत.स्थानिक लोकांकडून मदत व बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.ही ट्रेन चेन्नई सेंट्रल ते कोलकाता येथील शालीमार रेल्वे स्टेशन दरम्यान धावते.शुक्रवारी सायंकाळी कोरोमंडल एक्सप्रेस ओडिशा राज्यातील बालासोरजवळ एका मालगाडीला धडकली.ही धडक इतकी भीषण होती की,एक्सप्रेसचे १८ डबे रुळावरून खाली उतरले.

विशेष मदत आयुक्त कार्यालयाने सांगितले की,बालासोरच्या जिल्हाधिकाऱ्यांनाही सर्व आवश्यक व्यवस्था करण्यासाठी घटनास्थळी पोहोचण्याचे आणि राज्य स्तरावरून अतिरिक्त मदतीची आवश्यकता असल्यास SRCला कळवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.SRCने आपत्कालीन नियंत्रण कक्ष क्रमांक जारी केला आहे:0678 2262286

HWH हेल्पलाइन क्रमांक – ०३३- २६३८२२१७
KGP हेल्पलाइन क्रमांक – 8972073925, 9332392339
BIS हेल्पलाइन क्रमांक – ८२४९५९१५५९, ७९७८४१८३२२
SHM हेल्पलाइन क्रमांक – 9903370746

मुंबई-गोवा ‘वंदे भारत एक्स्प्रेस’चा उद्घाटन कार्यक्रम रद्द
ओडिशामध्ये झालेल्या रेल्वे अपघाताच्या पार्श्वभूमीवर मुंबई-मडगाव दरम्यान धावणाऱ्या ‘वंदे भारत एक्स्प्रेस’चा शनिवारी होणारा उद्घाटन कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.’वंदे भारत एक्स्प्रेस’चा उद्घाटन कार्यक्रम मडगाव येथे पडणार होता. कार्यक्रमासाठीची तयारी पूर्ण झाली होती. मात्र, अपघातामुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती कोकण रेल्वेकडून देण्यात आली आहे.

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.