बाबाजू थिएटर तर्फे आज ‘रागरंग’ या कार्यक्रमाचे आयोजन 

0

नाशिक,दि. ३ जून २०२३- बाबाजू थिएटरतर्फे  तरुण संगीतप्रेमी तसेच जेष्ठ नागरीक यांना अनोखी मेजवानी देण्यासाठी रागदारीवर आधारीत हिंदी-मराठी भाषेत अजरामर झालेल्या गाण्यांचा कार्यक्रम “रागरंग” या कार्यक्रमाचे आयोजन आज शनिवार दिनांक ३ जून २०२३ रोजी संध्याकाळी ६.१५ वा  कुर्तकोटी सभागृह, शंकराचार्य न्यास, जुना गंगापूर नाका, नाशिक येथे करण्यात आले आहे. गत २२ वर्षांपासून बाबाजू थिएटरची नाशिकमधील सांस्कृतिक चळवळीतील एक परीपूर्ण संस्था आपल्या सहकार्याने गेली २२ वर्षे विविध कार्यक्रमांच्या साक्षीने रसिकांचे मनोरंजन महाराष्ट्रभर करीत आहे. तसेच विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन यशस्वीरित्या करत असतात .

सदर कार्यक्रम विनामूल्य असून सदर कार्यक्रमामध्ये डॉ. प्रमोद शिंदे, आनंद अत्रे, संजय अडावदकर, आरती पिंपळकर, रसिका नातू, प्राजक्ता अत्रे हे प्रतिथयश कलावंत आपली गायनातील कला सादर करणार असून, वादकवृंदामध्ये जितेंद्र सोनवणे, रोहित जाधव, चैतन्य पाळेकर यांचा समावेश असून ध्वनी संयोजन राम नवले सांभाळणार आहेत. सदर कार्यक्रमाची संकल्पना प्रशांत जुन्नरे यांची असून सदर कार्यक्रमास कौशल्य हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे डॉ. प्रमोद शिंदे यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.

या  कार्यमाचे आयोजन कैलास पाटील, एन.सी. देशपांडे, श्यामराव केदार, जे. पी. जाधव, दिलीपसिंह पाटील, प्रा. डॉ. दिलीप कुलकर्णी यांचेतर्फे करण्यात आले आहे… त्याच बरोबर या  कार्यक्रमादरम्यान सांस्कृतिक क्षेत्रात भरीव योगदान दिल्याबद्दल अॅड. सौ. इंद्रायणी पटणी (सांस्कृतिक) जेष्ठ रंगकर्मी सुनिल ढगे व छंदोमयी प्रसाद देशपांडे यांना जेष्ठ अर्थतज्ञ डॉ. प्रा. विनायकराव गोविलकर यांचे हस्ते “कृतज्ञता सन्मान पुरस्कार देवून गौरविण्यात येणार आहे.

तरी या  कार्यक्रमाचा सर्व जेष्ठ नागरीक व नाशिकमधील संगीतप्रेमी रसिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन बाबाजू थिएटरचे प्रशांत जुन्नरे, एन.सी. देशपांडे, श्यामराव केदार, जे.पी. जाधव, दिलीपसिंह पाटील, प्रा. डॉ. दिलीप कुलकर्णी यांनी केले आहे. सदर कार्यक्रमास आपली उपस्थिती प्रार्थनीय असून सदर विनामूल्य कार्यक्रमाचा संगीतप्रेमी रसिकांनी आवर्जुन आस्वाद घ्यावा असे आवाहन बाबाज थिएटरचे अध्यक्ष प्रशांत जुन्नरे यांनी केले आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!