ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी
जेष्ठ कृष्ण दशमी.
राहू काळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०
आज सकाळी ९.०० नंतर चांगला दिवस.
चंद्र नक्षत्र – रेवती.
आज जन्मलेल्या बाळाची राशी – मीन/ मेष.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
मेष:- सकाळचा रवी चंद्र लाभ योग आर्थिक चिंता कमी करणारा आहे. मात्र घरासाठी खर्च करावा लागेल.
वृषभ:- अनुकूल चंद्र मान सन्मान बहाल करणारा आहे. वाकसिद्धी लाभेल. दुपारनंतर खर्चात वाढ संभवते.
मिथुन:- आज पूर्वार्धात केलेला खर्च भविष्यात नफा देऊन जाईल. उत्तरार्ध अनुकूल आहे. प्रवासासाठी अर्थनियोजन कराल.
कर्क:- वैज्ञानिक दृष्टीकोन मदतीला धावून येईल. कीर्ती दिगंत पसरेल.कौतुक होईल. पत्नीची मर्जी मात्र सांभाळावी लागेल.
सिंह:- दिवसाचा पूर्वार्ध संथ आहे. तरीही नोकरी व्यवसाय तर करावाच लागेल.आळस झटकून कामाला लागा.आवडत्या व्यक्तीसाठी खर्च होणार आहे.
कन्या:- पत्नीला खुश ठेवले, गृहलक्ष्मीचा सल्ला ऐकला तर फायदा होणार आहे. आज कनिष्ठ सहकारी तुमचे भले करू शकतात.
तुळ:– तुमच्या विशिष्ट स्थानाचा लाभ होईल. अधिकार गाजवाल. दुपारनंतर पत्नीसमवेत वेळ व्यतीत कराल.
वृश्चिक:- सौख्य लाभेल. जमीन व्यवसायात यश मिळेल.प्रगती होईल. संयम बाळगावा लागेल.
धनु:- तुमचा आजचा दिवस जरासा उशिराच चालू होईल.मात्र स्पर्धेत तुम्ही विजयश्री खेचून आणाल. विनाकारण राजकारण करू नका.
मकर:- सकाळच्या सत्रात महत्वाची कामे उरकून घ्या. तुमच्या आवडत्या राजकीय क्षेत्रात बाजी माराल.
कुंभ:- सुखदायक दिवस आहे. ऐश्वर्य लाभेल. अर्थार्जन होईल. मात्र आवडत्या व्यक्तीकडून निराशा पदर पडेल.
मीन:- पूर्वार्ध अनुकूल आहे. महत्वाची कामे पूर्ण करा. घरगुती कामाला मर्यादा येतील.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन,’राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या.”राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी -8087520521)
