समृद्धी महामार्गावर बसला मोठा अपघात : २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू 

0

बुलढाणा दि,१ जुलै २०२३ –आज दिनांक १ जुलै २०२३ रोजी रात्री २.०० वाजताचे सुमारास सिंदखेड राजा तालुक्यात गौ शिवारात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर नागपूरकडून मुंबईच्या दिशेने असलेल्या विदर्भ ट्रॅव्हल क्र. MH29 BE1819 ला भीषण अपघात होऊन या बस ने पेट घेतला यामध्ये २५ प्रवाशाचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती हाती येत आहे  या घटनेत ८ जण जखमी झाले असून त्यांना सिंदखेडराजा येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारच्या वतीनं पाच लाखांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे.

विदर्भ ट्रॅव्हल्सची बस नागपूरहून पुण्याकडे जात असताना सिंदखेडराजा येथील पिंपळखुटा गावानजीक समृद्धी महामार्गावर बसचा अपघात झाला. हाती आलेल्या माहितीनुसार, बसचा टायर फुटल्यामुळं हा अपघात घडला आहे. महामार्गावर बस सर्वात आधी दुभाजकाला जाऊन धडकली.त्यानंतर काही अंतरावर जाऊन बस पलटी झाल्याची माहिती समोर येते. या अपघातात बसचा एक ड्रायव्हर बचावला आहे. त्याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, बस दुभाजकाला धडकल्यानंतर बसमधील डिझेल टँकला धडक बसली त्यानंतर टँक फुटल्याने मोठा स्फोट झाला त्यातच बसने पेट घेतला. बसचा दरवाजा असलेल्या ठिकाणीच आग भडकल्याने प्रवाशांना तिथून बाहेर पडण्यास संधीच मिळाली नाहीये.तसंच,रात्रीची वेळ असल्याने बहुंताश प्रवासी हे झोपेत होते.त्यामुळं त्यांना बाहेर पडता आलं नाही.

प्राथमिक माहितीनुसार गाडीमध्ये ३३ प्रवासी व ट्रॅव्हलचे तीन कर्मचारी होते.पैकी सात ते आठ प्रवासी बाहेर पडले असून २५ प्रवासी मृत्युमुखी पडले आहेत मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. घटनास्थळी पोलीस, आरोग्य, महसूल सह इतर शासकीय गा उपस्थित असून बचाव कार्य सुरु आहे. तसेच प्रवाशांची नावे मिळविण्याचे प्रयत्न सुरु आहेत.ही बस यवतमाळ ची विदर्भ ट्रॅव्हल्स आहे ३३ पैकी २५ प्रवासी जळून मृत्यू झाला आहे.

समृध्दी महामार्गावर आज झालेल्या अपघातासंदर्भात खासगी बस मधील जखमी / मृतक प्रवाशांच्या नातेवाईकांनी  जिल्हाधिकारी बुलढाणा  कार्यालयात जिल्हाधिकारी कार्यालय आपत्ती व्यवस्थापन विभाग मोबाईल क्र.7020435954 व 07262242683 या नंबर वर संपर्क साधावा.असे आवाहन आहे.

 

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.