मुंबई,दि. ८ जुलै २०२३ – अजित पवार यांच्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री अजित पवार आमनेसामने आले आहेतअशातच राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांसह बंडखोरांना भाविनक साद घातली आहे.अजित पवारांसह बंडखोरांनी परत यावे,मी राजकारण सोडतो असे विधान त्यांनी केले आहे. ते माध्यमांशी बोलत होते.
जितेंद्र आव्हाड माध्यमांशी बोलतांना म्हणाले आम्ही दोन-चार जणांमुळे बाहेर पडल्याचे अजित पवार यांच्यासोबत गेलेले आमदार बोलत आहेत. मी शपथ घेतो, मी तर सोडाच… मी जयंत पाटलांनाही घेऊन जाईन. या बडव्यांना शरद पवारांना घेरलंय अशी टीका ते करत आहेत. या बडव्यांना नाही रहायचं… आम्ही सोडून जातो, तुम्ही परत या. साहेबांना त्रास देऊ नका, असे विधान आव्हाड यांनी केले.
मला सत्तेचे राजकारण करायचे नाही. पैशाचे राजकारण करायचे नाही. तुम्हाला वाटत असेल माझ्यासारखा माणूस पक्षातून बाहेर गेल्याने पक्ष खूप वाढणार आहे, तर मी राजकारण सोडतो, असे आव्हाड म्हणाले.
साहेबांच्या सोबत मी आणि खा.डॉ.अमोल कोल्हे.
चलो येवला..! #लढायचय_जिंकायचय pic.twitter.com/BrcENI3vLp— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) July 8, 2023
दरम्यान, राष्ट्रवादीतील फुटीनंतर शरद पवार मैदानात उतरले असून थेट बंडखोरांच्या मतदारसंघात सभा घेत आहेत. पवारांनी राज्यव्यापी दौऱ्याची घोषणा केली आहे. आज त्यांची पहिली सभा छगन भुजबळ यांच्या बालेकिल्ल्यात आहे. आज सकाळीच शरद पवार मुंबईहून नाशिककडे येण्यासाठी निघाले आहेत नाशिकमधील येवला येथे पवारांची सभा होत असून येथे ते काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.