टेस्लाची इलेक्ट्रिक कार लवकरच भारतात तयार होणार 

काय किंमत असणार जाणून घेऊया 

0

नवी दिल्ली,दि.१३ जुलै २०२३ –अमेरिकन इलेक्ट्रिक कार निर्माता कंपनी टेस्लाने भारतात कारखाना सुरू करण्याच्या गुंतवणुकीच्या प्रस्तावावर केंद्र सरकारशी चर्चा सुरू केली आहे. कंपनीच्या कारखान्याची वार्षिक क्षमता सुमारे पाच लाख युनिट्स असेल. कंपनीच्या भारतीय बनावटीच्या इलेक्ट्रिक कारच्या किंमती २० लाख रुपयांपासून सुरू होऊ शकतात.

सरकारी सूत्रांच्या हवाल्याने एका मीडिया रिपोर्टमध्ये असे सांगण्यात आले आहे की अब्जाधीश एलोन मस्क यांच्या नेतृत्वाखालील ही कंपनी भारताला निर्यातीचा आधार बनवण्याची योजना आखत आहे. टेस्लाने रॉयटर्सच्या टिप्पणीच्या विनंतीला प्रतिसाद दिला नाही. मस्क यांची गेल्या महिन्यात अमेरिकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेट झाली होती. या भेटीत मोदींनी मस्क यांना भारतात गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित केले. यानंतर मस्क म्हणाले की, भारतात लवकरात लवकर गुंतवणूक करण्याचा विचार करत आहोत.ते म्हणाले,”जगातील कोणत्याही मोठ्या देशापेक्षा भारतात अधिक क्षमता आहे. मला खात्री आहे की टेस्ला लवकरात लवकर भारतात येईल.” पुढील वर्षी भारत दौऱ्यावर येण्याचे संकेतही मस्क यांनी दिले.

टेस्ला या वर्षाच्या अखेरीस पूर्णपणे स्वायत्त वाहने बाजारात आणणार आहे. कंपनी गेल्या काही वर्षांपासून हे तंत्रज्ञान विकसित करत आहे.तत्पूर्वी,मस्क पूर्णपणे स्वायत्त सेल्फ-ड्रायव्हिंग वाहने आणण्यासाठी त्यांची अंतिम मुदत पूर्ण करू शकले नाहीत. “मला वाटते की आम्ही मानवी देखरेखीशिवाय पूर्ण स्व-ड्रायव्हिंग साध्य करण्याच्या अगदी जवळ आहोत,” मस्क यांनी चीनमधील शांघाय येथे कृत्रिम बुद्धिमत्तेवरील परिषदेला व्हिडिओ लिंकद्वारे आपल्या भाषणात सांगितले.मला विश्वास आहे की अशी वाहने या वर्षाच्या अखेरीस लॉन्च केली जाऊ शकतात.”

हे तंत्रज्ञान सुरू करण्याच्या आधी ते कधी लॉन्च होईल त्यांचा अंदाज लावणे चुकीचा असल्याचे त्यांनी मान्य केले होते. मस्क म्हणाला, “मला वाटतं की आम्ही पूर्वीपेक्षा या वेळी त्याच्या जवळ आहोत.” टेस्लासाठी चीन ही सर्वात मोठी बाजारपेठ आहे. अलीकडेच कंपनीने शांघायमध्ये दुसरा मोठा कारखाना सुरू करणार असल्याचे सांगितले होते. टेस्लाच्या दुसऱ्या तिमाहीत वाहन वितरण ८३ टक्के वाढले. कंपनीने गेल्या काही महिन्यांत अनेक वेळा वाहनांची कपात केली आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.