पुणे,दि. १५ जुलै २०२३ –पुणे,दि.१५ जुलै २०२३ – मराठी चित्रपटासृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते रवींद्र महाजनी यांचे निधन झालं आहे.ते ७७ वर्षांचे होते .मावळ तालुक्यातील आंबी इथे एका बंद खोलीत त्यांचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ते अनेक दिवसांपासून इथे वास्तव्यास होते अशी माहिती समोर येत आहे.त्यांचा मृत्यू तीन दिवसापूर्वी झाला असावा डॉक्टरांनी सांगितले
तसेच त्यांच्या घरातून वास येऊ लागल्याची माहिती पोलिसांना कळवल्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले तेव्हा हा प्रकार उघडकीस आला
तळेगाव एमआयडीसी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मराठी चित्रपट अभिनेते रवींद्र महाजनी हे मागील ८ ते ९ महिन्यापासून आंबी (ता.मावळ) हद्दीतील एक्झर्बिया सोसायटीमध्ये राहत होते. त्यांच्यावर काहीदिवसापूर्वी शस्त्रक्रिया झाली होती.अंघोळ करून कपडे बदलत असताना त्यांचा मृत्यू झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.सदर बाब समजल्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पंचनामा करुन मृतदेह ताब्यात घेतला.
मराठीतील दिग्गज नट काळाच्या पडद्याआड…
रवींद्र महाजनी यांनी हिंदी मराठी चित्रपटात अनेक अजरामर भूमिका केल्या आहेत. त्यांचे देवता, मुंबईचा फौजदार, झुंज, लक्ष्मी, गोंधळात गोंधळ, हळदी कुंकू असे चित्रपट प्रचंड गाजले आहेत. तसेच दिग्दर्शक, निर्माता देखील त्यांनी काम केले. अभिनेत्री रंजना, उषा नाईक व आशा काळे आदींसोबत त्यांनी चित्रपट केले आहे. खेळ कुणाला दैवाचा कळला या प्रसिद्ध गाण्यातील रवींद्र महाजनी कुणीही विसरू शकत नाही.