नाशिक,दि.१८ जुलै २०२३ – आजची सकाळ उजाडताच नाशिक शहरातील नागरिकांचे हाल सुरू झाले आहेत.. कारण सिटी लिंक बस कर्मचाऱ्यांनी पुन्हा कामबंद आंदोलन सुरू केलंय.नाशिक शहरातील सिटीलिंक बसचे सर्व वाहक कर्मचारी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज (१८ जुलै २०२३) पहाटेपासून बेमुदत संपावर गेल्याने सामान्य चाकरमानी आणि विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहेत.
गेल्या दोन महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचे पगार थकल्यामुळे सिटीलिंक बसचे सर्व वाहक कर्मचारी संपावर गेले आहेत. आज पहाटेपासून या संपाला सुरुवात झाली असून प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन श्रमिक कामगार सेनेमार्फत पुकारण्यात आले आहे.
ठेकेदारकरून अटी शर्थीचे भंग झाल्याने दंड करण्यात आला आहे.त्यात कर्मचाऱ्यांचा पगार मिळत नसल्याने हा संप पुकारण्यात आला असल्याचे कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.