कोल्हापूर- तलावाजवळ खेळता खेळता लहान मुलांना एका प्लॅस्टिकच्या पिशवी सापडली.मुलांनी पिशवी उघडून पाहताच त्यांना चक्क सोन्याची बिस्कीट आणि सोन्याची नाणी सापडली हे सोने तब्बल २४ लाखांचे असल्याचे समोर आले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील गडमुडशिंगेमध्ये खेळणाऱ्या मुलांना चक्क लाखो रुपयांचे सोने सापडले. त्यामुळं एकच खळबळ उडाली आहे. गावातील तलावाजवळ खेळत असताना मुलांना एक प्लास्टिक पिशवी सापडली. मुलांनी पिशवी उघडून पाहताच त्यांना सोने सापडले. हे सोने तब्बल २४ लाखांचे असल्याचे समोर आले आहे. गांधीनगर पोलिसांना खबऱ्यांमार्फत ही माहिती मिळताच पोलिसांनी मुलांजवळची सोन्याची बिस्कीट आणि सोन्याची नाणी ताब्यात घेतली
कोल्हापूर जिल्ह्यातील गडमुडशिंगे इथं राहत असणारे रोहित गडकरी,ऋषिकेश गडकरी,चेतन गवळी आणि नागेश कांबळे ही चार मुलं काहीदिवसापूर्वी तलावाकाठी खेळत होती.त्यावेळी त्यांना गवतामध्ये एक प्लास्टिकची पिशवी दिसून आली. त्यावेळी या चौघांनी ही पिशवी उघडून पाहताच त्यांना त्यात सोन्याची बिस्किटे आणि सोन्याची नाणी आढळून आली. या चौघाही मुलांनी ही प्लास्टिकची पिशवी घेऊन आपल्या पालकांच्या स्वाधीन केली.
या घटनेनंतर स्थानिक खबऱ्यांमार्फत गांधीनगर पोलिसांना लहान मुलांना सोन्याची बिस्किट आणि सोन्याची नाणी असणारी पिशवी सापडली असल्याची माहिती दिली.गांधीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन स्थानिक विश्वास गडकरी आणि सुभाष गवळी यांच्याकडे चौकशी केली. त्यावेळी घडलेला प्रकार या दोघांनीही पोलिसांना सांगितले. पोलिसांनी दहा ग्रॅमचे सोन्याचे ४ बिस्किटे,१० ग्रॅमचे दोन नाणी आणि ५ ग्रॅमचे दोन नाणी असा २४ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. गांधीनगर पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत असून जप्त केलेला ऐवज ज्यांचा आहे त्यांनी खात्रीशीर ओळख पटवून ताब्यात घ्यावे, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.गोपनीय खबऱ्यामार्फत ही माहिती मिळाल्याने पोलिसांनी कारवाई करण्यात आली.