चांद्रयान-३ आज चंद्राच्या चौथ्या कक्षेत प्रवेश करणार

कशी होणार हि प्रक्रिया जाणून घेऊ या 

0

नवी दिल्ली,दि १४ ऑगस्ट २०२३ – चंद्रावर तिरंगा फडकवायला निघालेल्या चांद्रयान-3 ला आज एक महिना पूर्ण झाला आहे. चांद्रयान-३ चंद्राच्या दिशेने  सतत आणि यशस्वीपणे प्रवास करत आहे.आजपासून सुमारे ९ दिवसांनी म्हणजेच २३ ऑगस्ट रोजी ते चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल.पण आजचा दिवस १४ ऑगस्ट चांद्रयान-3 साठीही खूप खास आहे.

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) १४ ऑगस्ट रोजी पुन्हा एकदा चांद्रयान-3 ची कक्षा कमी करणार आहे. चांद्रयान-3 अंतराळयान चंद्राच्या पृष्ठभागाच्या जवळ आणण्यासाठी ही प्रक्रिया आज  केली जाईल. अशाप्रकारे चांद्रयान-3 आज चंद्राच्या चौथ्या कक्षेत प्रवेश करेल. गेल्या वेळी ९ ऑगस्ट रोजी हा प्रयत्न करण्यात आला होता. यानंतर अंतराळयानाची कक्षा १७४ किमी x १,४३७ किमी इतकी कमी झाली.चांद्रयान-3 ने ५ ऑगस्ट रोजी चंद्राच्या कक्षेत यशस्वीपणे प्रवेश केला. आता पुढील डी-ऑर्बिटिंग १६ ऑगस्ट रोजी केले जाईल.

चांद्रयान-3, येत्या २३ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल आणि येथे १४ दिवस काम करेल अशी माहिती आहे. चांद्रयान-3 हे चांद्रयान-2 चा फॉलो-अप मिशन आहे. चंद्राच्या पृष्ठ भागाभोवती सुरक्षितपणे उतरण्याची आणि प्रदक्षिणा घालण्याची एंड-टू-एंड क्षमता प्रदर्शित करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. चांद्रयान-3 मध्ये स्वदेशी प्रोपल्शन मॉड्यूल, लँडर मॉड्यूल आणि आंतर-ग्रहीय मोहिमांसाठी आवश्यक नवीन तंत्रज्ञान विकसित आणि प्रदर्शित करण्यासाठी रोव्हर यांचा समावेश आहे.

आणि गेल्या आठवड्यात इस्रोचे प्रमुख  एस. सोमनाथ यांनी चांद्रयान-3 चे विक्रम लँडर २३ ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करेल असा विश्वास सोमनाथ यांनी व्यक्त केला होता. सोमनाथ म्हणाले होते की, चांद्रयान-३ चे सर्व सेन्सर किंवा इंजिन निकामी झाले तरी लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर योग्य लँडिंग करेल. सोमनाथ म्हणाले की, ‘विक्रम’ लँडर अशा प्रकारे तयार करण्यात आले आहे की ते अपयश हाताळण्यास सक्षम असेल.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.