Nashik:जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त १९ ऑगस्टला छायाचित्रकारांचा सन्मान सोहळा
अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या शुभहस्ते होणार सन्मान
नाशिक,दि.१८ ऑगस्ट २०२३ – जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त १९ ऑगस्टला फोटोग्राफी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या छायाचित्रकार व प्रेस फोटोग्राफर बंधुचा सत्कार व सन्मान आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे -मा. श्री छगनरावजी भुजबळ ( अन्न व नागरी पुरवठा मंत्री ) यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे समवेत नाशिक छायाचित्रकार संघटनेचे अध्यक्ष संजय जगताप व नाइस डिजिटल प्रेस चे संचालक मा. संजय चौधरी यांच्या उपस्थितीत राहणार आहे.
जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त शनिवार दि. १९ ऑगस्टला नाशिकमधील छायाचित्रकारांचा सन्मान सोहळा व Aiआर्टिफिशियल इंटेलिजन्स वर महाराष्ट्रात पहिल्यांदा नाशिक मध्ये मार्गदर्शन व कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.सोबत Ai वर मुंबई येथील प्रसिद्ध छायाचित्रकार मा चेतन मेहता यांचे मार्गदर्शन आहे, फोटोग्राफी साहित्याचे स्टाॅल व प्रदर्शन, डाटा रिकव्हरी स्टाॅल व उपस्थित छायाचित्रकार बंधुन मधुन १५ फोटोग्राफी उपयुक्त मोठे लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे. असा भरगच्च कार्यक्रम सकाळी ११ वा.श्री कालिका माता मंदिर हाॅल.मुंबई नाका येथे होणार आहे.
तसेच जागतिक छायाचित्रदिना निमित्त सोमवार दि २१ ऑगस्ट रोजी एचआरडी सेंटर सिबीएस जवळ नाशिक येथे पुणे फोटो फेअर सुमित जैन यांच्या सहकार्यांने प्रि -वेंडिग याविषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आल्याचे अध्यक्ष संजय जगताप यांनी सांगितले तर कार्यक्रम यशस्वीते साठी नाशिक छायाचित्रकार संघटना कमिटी मेंबर सर्व सभासद आणि नाइस डिजिटल अल्बम चे संजय चौधरी व पुणे फोटो फेयरचे सुमित जैन व छायाचित्रकार नंदु विसपुते,प्रताप पाटील,प्रशांत तांबट,सचिन निरंतर,सौरभ अमृतकर,रविंद्र गवारे,किरण मुर्तडक,राज चौधरी,आदि छायाचित्रकार प्रयत्नशील आहेत
वरील सर्व कार्यक्रमात छायाचित्रकार बंधुनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.वरील सर्व कार्यक्रम विनामूल्य असून नोंदणी करणे आवश्यक आहे.आधिक माहिती साठी संपर्क – 9422259503, 9422755552,9823130450