भारताची चंद्रावर स्वारी : विक्रम लँडर चंद्रावर यशस्वीपणे उतरले 

सुप्रसिद्ध संगीतकार धनंजय धुमाळ यांनी चांद्रमोहीम यशस्वी झाल्या बद्दल केले आगळे वेगळे गाणे

0

श्रीहरीकोटा,दि २३ ऑगस्ट २०२३- हिदुस्तानासाठी आज ऐतिहासिक दिवस असून आज चांद्रयान ३ ने चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केली आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग केले आहे. इसरो ची चांद्रयान ३ मोहीम यशस्वी झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ऐतिहासिक मोहिमेला यशस्वी केल्या बद्दल सर्व शास्त्रज्ञांना शुभेच्छा दिल्या ..

भारताचे चांद्रयान-३ आज (दि. २३) सायंकाळी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सहा वाजून चार मिनिटांनी पाेहचले. या यशाने संपूर्ण देशात एकच जल्‍लाेष झाला. चांद्रयान-३ माेहिम यशस्वी झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी संवाद साधला.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र माेदी म्‍हणाले, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारे भारताचे पहिले यानआहे. तसेच चंद्रावर पोहोचणारा भारत हा चौथा देश (Chandrayaan 3 Landing Live) ठरला आहे. चांद्रयान-३ ही मोहिम जरी भारताची असली तरी साऱ्या जगाचे लक्ष या मोहिमेकडे लागले होते. प्रत्येक भारतातील नागरिक या मोहिमेसाठी उत्सुक होता. आता या यशस्वी मोहिमेनंतर प्रत्येक नागरिकाचा आनंद द्विगुणित झालेला आहे.

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत जगातील पहिलाच देश ठरला आहे.

सुप्रसिद्ध संगीतकार धनंजय धुमाळ यांनी  भारताची चांद्रमोहीम यशस्वी झाल्या निमित्ताने एक गाणे केले आहे ते जनस्थानच्या वाचकांसाठी 

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.