महिलांच्या आरोग्य समस्या आणि तपासणी याची एक सुसूत्रता असावी -डॉ.प्रणिता संघवी

कर्तृत्वांगण सोशल फाउंडेशनच्या वतीने महिलांसाठी आरोग्य चर्चासत्र संपन्न

0

नाशिक,दि.२ सप्टेंबर २०२३ –कर्तृत्वांगण सोशल फाउंडेशन आणि अशोका मेडीकव्हर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने रक्षाबंधन दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ आणि प्रसूती तज्ञ डॉ. प्रणिता संघवी आणि आहार तज्ज्ञ डॉ स्नेहल जमगावकर यांच्या चर्चासत्राचे आयोजन कर्तृत्वांगणच्या आरोग्यक्रांती फोरम तर्फ़े करण्यात आले होते.

संवादातून सुसंवादाकडे या उक्ती प्रमाणेच झाले अगदी मोजक्या पण प्रभावी शब्दात दोन्ही डॉक्टरांनी मार्गदर्शन तर केलेच परंतु अनेक प्रश्नाचे शंकाचे निरसन ही केले मासिक पाळी ते गर्भधारणा ते गर्भाशयाचे आजार गर्भाशयाचा कर्करोग पीसीओडी (पॉलिसिस्टीक ओव्हरियन डिसिज)याविषयी लक्षणे ,समस्या आणि तपासणी याची एक सुसूत्रता कशी असते याचे विश्लेषण डॉ.प्रणिता संघवी यांनी महिला मुलींना सोप्या भाषेत समजावले.

तसेच संतुलित आहार म्हणजे नेमकं काय ?कोणतं घटक किती शरीरात किती प्रमाणात असावा तो घटक नेमकं कोणत्या अन्नधान्यतुन मिळतो भाज्या फळे शिवाय व्यायाम याचे महत्त्व पटवून देताना डॉ स्नेहल जमगावकर यांनी वजन वाढ आणि होणारे आजार यांची माहिती दिली.

कर्तृत्वांगण सोशल फाउंडेशनच्या संस्थापिका किर्ती जाधव- निकम यांनी प्रास्ताविक तसेच आरोग्यक्रांती आणि संस्थेच्या इतर फोरम ची माहिती दिली महिलांनीच करावे आता आपुले रक्षण आणि आम्ही करतोय तुमचे रक्षण करून सशक्तीकरण अशी ग्वाही ही दिली

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगशिक्षिका भारती सोनवणे यांनी केले याप्रसंगी अशोका मेडीकव्हर हॉस्पिटल च जनसंपर्क अधिकारी सिध्दार्थ गोरे कर्तृत्वागण सोशल फाउंडेशन च्या प्रोग्राम ऑफिसर वंदना सोनवणे कर्तृत्वागण सोशल फाउंडेशन च्या सर्व सदस्य पदाधिकारी आणि महिला माता भगिनी आणि मुलींचा या चर्चासत्रास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला

There should be a coordination of women's health problems and checkups -Dr.Pranita Sanghvi

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.