Ai आर्टिफिशल इंटेलिजन्स वर वेडिंग फोटोग्राफी कार्यशाळा उत्साहात संपन्न
भारती विद्यापीठ स्कूल ऑफ फोटोग्राफी व सिनेमॅटोग्राफी यांच्या वतीने नाशिक मध्ये प्रथमच आयोजन : २४० छायाचित्रकारांचा लक्षणीय सहभाग
नाशिक,दि.९ सप्टेंबर २०२३ –नाशिक जिल्ह्यातील छायाचित्रकार बंधू-भगिनींसाठी भारती विद्यापीठ स्कूल ऑफ फोटोग्राफी व सिनेमॅटोग्राफी यांच्या वतीने एक दिवसीय ए आय आर्टिफिशल इंटेलिजन्स वर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते
पुणे विद्यापीठाचे राजन चौगुले सर नाशिक छायाचित्रकार संघटनेचे अध्यक्ष संजय जगताप सह सेक्रेटरी नंदू विसपुते , कमिटी मेंबर प्रताप पाटील , प्रशांत तांबट, आदि उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते विद्यापीठाचे सर्वेसर्वा कै. संस्थापक कुलगुरू पतंगरावजी कदम साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन व कॅमेरा पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली
नाशिक छायाचित्रकार संघटनेचे अध्यक्ष संजय जगताप यांच्या संकल्पनेतून आणि आमदार विश्वजीत कदम यांच्या प्रेरणेनेतून तसेच भारती विद्यापीठ स्कूल ऑफ फोटोग्राफी सिनेमॅटोग्राफी पुणे चे राजन चौगुले सर यांच्या मार्गदर्शनाखाली हि कार्यशाळा संपन्न झाली कार्यशाळेत श्री. राजन चौगुले सर , श्रेयश लोखंडे , अभिजीत भाटलेकर, शिरीष देसाई , तर ए आय वर सखोल मार्गदर्शन तसेच Ai ला घाबरण्याची गरज नसून सावध राहणे गरजेचे असल्याचे क्षितिज जाधव यांनी नमूद करून मार्गदर्शन केले
नवीन येऊ घातलेल्या एआय आरटीफिशियल इंटेलिजन्स चा उपयोग वेडिंग फोटोग्राफीत कसा होऊ शकतो यावर या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आले अतिशय सुंदर अशी माहिती मिळताच हाॅल मध्ये संपूर्ण टाळ्यांचा कडकडाट झाला पाऊस असतांना सुद्धा लक्षणीय सहभाग हा छायाचित्रकारांचा होता तर महिला छायाचित्रकार देखील या कार्यशाळेत सहभागी झाल्या होत्या उपस्थित व सहभागी प्रत्येक छायाचित्रकाराला यावेळी भारती विद्यापीठ स्कूल ऑफ फोटोग्राफी व सिनेमॅटोग्राफी पुणे चे प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले
कॉलेज रोड नाशिक येथील गोखले एज्युकेशन सोसायटीचा गुरुदर्शन ऑडिटेरियम हॉल या ठिकाणी या एक दिवसीय भव्यदिव्य अश्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते सह सेक्रेटरी नंदू विसपुते यांनी सूत्रसंचालन केले तर अध्यक्ष संजय जगताप यांनी आभार प्रदर्शन केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी कमिटी मेंबर छायाचित्रकार प्रशांत तांबट,प्रताप पाटील ,किशोर अहिरराव ,समीर बोंदार्डे,किरण तांबट, सौरभ अमृतकर ,रवींद्र गवारे ,संदीप भालेराव ,महादेव गवळी ,दुर्गेश रणदिवे,आदिने परिश्रम घेतले.