महाराष्ट्रावरील वीज संकट आणखी गहिरं :राज्यावर भारनियमनाची टांगती तलवार ?

सातही औष्णिक विद्युत केंद्र तिसऱ्या दिवशीही प्रभावित

0

मुंबई,दि.२६ सप्टेंबर २०२३ –महाराष्ट्रावरील वीज संकट आणखी गहिरं होणार आहे.राज्यातील सातही औष्णिक विद्युत केंद्रातील वीजनिर्मिती  सलग तिसऱ्या दिवशी प्रभावीत झाली आहे. त्यामुळे राज्यात  पुन्हा भारनियमन  होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

महाराष्ट्रातील सातही औष्णिक विद्युत केंद्रातून सध्या क्षमतेच्या ५० टक्केच वीजनिर्मिती केली जाणार आहे. पाऊस,ओला कोळसा आणि दुरुस्तींच्या कामामुळे सातही केंद्रातील वीजनिर्मिती प्रभावित झाली आहे. ९५४० मेगॅव्हॅटची क्षमता असताना सध्या फक्त ४७३२ मेगाव्हॅट वीजनिर्मिती या औष्णिक विद्युत केंद्रातून केली जात आहे. त्यामुळे ऐन गणेशोत्सवात राज्यावर भारनियमनाची टांगती तलवार आहे.

महाराष्ट्रात एकूण सात औष्णिक विद्युत केंद्र आहेत. या सात केंद्रावरून राज्यासाठी विजनिर्मिती केली जाते. परंतु, आज सलग तिसऱ्या दिवशी या केंद्रांवरील वीजनिर्मिती प्रभावित झाल्यानं राज्यातील वीज संकट गहिरं होण्याची शक्यता आहे. पाऊल, ओला कोळसा आणि दुरुस्तीची कामं खोळंबल्यानं या सातही वीजनिर्मिती केंद्रांच्या क्षमतेच्या केवळ 50 टक्केच वीजनिर्मिती सध्या सुरू आहे. आणखी काही दिवस असंच सुरू राहिलं तर मात्र, राज्याला भारनियमनाला सामोरं जावं लागू शकतं.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.