आजचे राशिभविष्य शनिवार,३० सप्टेंबर २०२३ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
भाद्रपद कृष्ण प्रतिपदा. वर्षा ऋतू, दक्षिणायन. 
राहुकाळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०
“आज चांगला दिवस आहे”
नक्षत्र: रेवती. आज जन्मलेल्या बाळाची राशी- मीन/मेष. 
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521) 

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) अनुकूल दिवस आहे. त्याचा लाभ घ्या. नवीन सुरुवात करा. मत्सर त्रास मात्र जाणवेल.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो) अनुकूल चंद्र उत्साह प्रदान करेन. प्रेमात यश लाभेल. मात्र वाहन चालवताना काळजी घ्या.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) व्यावसायिक यश लाभेल. स्वभावाचा लाभ मिळेल. राजमान्यता लाभेल. गृहकलह टाळा.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) भाग्य विकास होईल. संपन्नता  जाणवेल. मंत्रतंत्राचे अधिष्ठान लाभेल.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) अष्टम स्थानी चंद्र आहे. फारशी अनुकूलता नाही. महत्वाचे निर्णय घेताना काळजी घ्या.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) एखादी हरवलेली वस्तू आज सापडेल. क्षमता वाढतील. क्रोधावर नियंत्रण ठेवा.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) आर्थिक लाभ होतील. मात्र चीज वस्तू सांभाळा. चोरीचे भय आहे. वाद विवाद टाळा.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) जुन्या गुंतवणुकीतून उत्तम परतावा मिळेल. लॉटरी काढून बघण्यास हरकत नाही. दबदबा वाढेल.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) मनाने मुक्त अन मनाने बद्ध! या उक्तीचा प्रत्यय येईन. गृह सौख्य लाभेल. नोकरीत काही कटकटी होऊ शकतात.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) कर्म सिद्धी साधेल. मान मरातब वाढेल. यशस्वी व्हाल. प्रवासात त्रास संभवतो.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) अजूनही फारशी अनुकूलता नाही. आर्थिक प्रश्न निर्माण होतील. डोळ्यांची काळजी घ्या.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) जोडीदाराशी मतभेद संभवतात. नेहमीची कामे चालू ठेवा. मेजवानीचे योग आहेत.

( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!