सिंहस्थ कुंभमेळ्या पर्यंत प्लास्टिक मुक्त गोदावरीचा संकल्प करू -अध्यात्मिक गुरु श्री.एम.
अध्यात्मिक गुरु श्री.एम.यांच्या उपस्थितीत अविरल गोदावरी अभियानाचा शुभारंभ
नाशिक दि. २ ऑक्टोबर २०२३ –नाशिक मध्ये गोदावरीचे प्रदूषण टाळण्याच्या दृष्टीने उत्तमरीत्या काम होत असून पुढे होऊ घातलेल्या २०२७ च्या सिंहस्थ कुंभमेळ्या पर्यंत प्लास्टिक मुक्त गोदावरीचा संकल्प आपण सर्वजण करून गोदावरी नदीला शुद्ध करू असे आवाहन अध्यात्मिक गुरु श्री.एम.यांनी केले.
स्वच्छता अभियाना अंतर्गत गोदावरी प्रदूषण टाळण्याच्या दृष्टीने अविरल गोदावरी अभियान हाती घेण्यात आले आहे.त्याचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत सकाळी गोदापूजन दादा महाराज जगताप,योगयोगेश्वर जय शंकर सेवाभावी संस्थाचे प्रमुख गोदा पूजन करून अविरल गोदावरी कार्यक्रम शुभारंभ झाला.अध्यात्मिक गुरू श्री एम,मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.अशोक करंजकर,जिल्हाधिकारी जलज शर्मा,सिनेअभिनेता चिन्मय उदगिरकर यांच्या हस्ते गोदामाईची महाआरती करण्यात आली.
यावेळी कार्यक्रमात बोलताना अध्यात्मिक गुरु श्री एम सर यांनी सांगितले की,नाशिक मध्ये जे कार्य होत आहे ते कार्य उत्तमरीत्या होत असून अशाच पद्धतीने काम करून आगामी होऊ घातलेल्या २०२७ च्या सिंहस्थ कुंभमेळ्या पर्यंत प्लास्टिक मुक्त करण्याची प्रतिज्ञा घेणे महत्त्वाचे असून सर्वांनी या कार्यात सहभाग नोंदवून प्लास्टिक मुक्त व प्रदूषण मुक्त गोदामाई करण्याचे आवाहन अध्यात्मिक गुरु श्री एम. यांनी केले.
या कार्यक्रमात बोलताना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी सांगितले की नाशिक मध्ये स्वच्छता हे एक प्रमुख ध्येय असून त्यासाठी प्रशासकीय पातळीवर मोठ्या प्रमाणात काम केले जात आहे,त्याचबरोबर हरित नाशिक, स्वच्छ नाशिक करून आगामी होणारा सिंहस्थ कुंभमेळा हरित कुंभ म्हणून केला जाईल त्यामध्ये सर्वांचे सहकार्य व भूमिका महत्त्वाची असून त्यातून हरित कुंभ होईल असा विश्वास यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमास अध्यात्मिक गुरु श्री एम सर,मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.अशोक करंजकर, जिल्हाधिकारी जलज शर्मा,मनपा अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी,उपायुक्त डॉ. विजयकुमार मुंडे,घनकचरा व्यवस्थापन संचालक डॉ.आवेश पलोड,लक्ष्मण सावजी, क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियाचे नाशिक चे पदाधिकारी जितूभाई ठक्कर,हेमंत राठी, नमामी गोदाचे राजेश पंडित, मराठा विद्या प्रसारक संस्थेचे सरचिटणीस नितीन ठाकरे, माजी नगरसेविका,स्थायी सभापती हिमगौरी आडके,सकाळ समूहाचे व्यवस्थापकीय संचालक अभिजीत पवार,मनपा जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद,पंचवटी विभागीय अधिकारी योगेश रकटे,विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय दराडे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
आध्यात्मिक गुरु श्री एम.यांनी पर्यावरणावर स्वलिखित पुस्तक व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांना भेट देऊन त्यांचा गौरव केला.या कार्यक्रमात ललित बारी यां विद्यार्थ्यांने जल प्रतिज्ञा दिली. अभिनेते चिन्मय उदगीरकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. अभिनेते किरण भालेराव व जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद यांनी सूत्रसंचालन केले.राजेश पंडित यांनी उपस्थितांचे आभार मानले.
श्री एम यांनी साधला गोदा स्वयंसेवकांशी संवाद
गोदावरी नदी काठीच्या गंगापूर अमरधाम, सोमेश्वर धबधबा, सोमेश्वर मंदिर, नवश्या गणपती, आनंदवली गावातील पूल,शहीद अरुण चित्ते पूल, सुयोजित गार्डन पूल परिसर,सुंदर नारायण मंदिर व अहिल्याबाई होळकर पूल ते गाडगे महाराज पूल आदी भागात सुरू असलेल्या स्वच्छता मोहिमेची पाहणी करून स्वच्छता करणाऱ्या स्वयंसेवी संस्था व त्यांच्या स्वयंसेवकांशी संवाद साधला.यावेळी त्यांच्या समवेत सिने अभिनेता निर्माता चिन्मय उदगिरकर, मनपा प्रशासक तथा आयुक्त डॉ.अशोक करंजकर,अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी,उपायुक्त डॉ. विजयकुमार मुंडे, घनकचरा व्यवस्थापन संचालक आवेश पलोड, मराठा विद्या प्रसारक संस्थेचे सरचिटणीस नितीन ठाकरे, आदी उपस्थित होते.
विविध संस्थांचा सहभाग
अविरल गोदावरी या कार्यक्रमाचे संयोजनात महाराष्ट्र शासन,नाशिक महानगरपालिका,नमामि गोदा फाउंडेशन,द सत्संग, कॉलिटी कौन्सिल ऑफ इंडिया,प्लॉगर्स ग्रुप,शौर्य फाउंडेशन,उडान फाउंडेशन,बाल विद्या प्रसारक मंडळ संचलित, आदर्श माध्यमिक विद्यालय, सीबीएस,ज्ञान अमृत आदिवासी संस्था,नाशिक पोलीस मित्र समन्वय समिती,नाशिक, अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था,नाशिक,अशोका एज्युकेशन फाउंडेशन, मराठा विद्या प्रसारक संस्था, सिडको महाविद्यालय,गुरुगोविंद सिंग फाउंडेशन,के के वाघ एज्युकेशन संस्था, सपकाळ नॉलेज हब, इंडियन मेडिकल असोसिएशन, समता समाज विकास संस्था संचलित आदर्श विद्यामंदिर नाशिकरोड, योग योगेश्वर जय शंकर सेवाभावी संस्था,सप्तशृंगी कॉलेज आदींसह विविध संस्थांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदविला. सकाळी ७ पासूनच रामकुंड येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण विविध संस्थांनी केले.