नवी दिल्ली,दि. ६ ऑक्टोबर २०२३ – निवडणूक आयोग शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (Nationalist Congress party ) दोन्ही गटांची बाजू ऐकून घेणार आहे. पक्षातील फूट मान्य करत निवडणूक आयोग आज दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेणार आहे. यासाठी दोन्ही प्रतिस्पर्धी गटांना पाचारण करण्यात आले आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाने राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या विरोधात बंडखोरी केली होती.
या वर्षी जुलैच्या सुरुवातीला महाराष्ट्र सरकारमध्ये सामील होण्यासाठी अजित पवार यांनी काका शरद पवार यांच्याविरुद्ध बंडखोरी करण्याच्या दोन दिवस आधी ३० जून रोजी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती. त्यांनी पक्षाच्या नावावर तसेच निवडणूक चिन्हावर दावा केला होता.आज त्यावर निवडणूक आयोग दोन्ही गटाचे म्हणणे ऐकून घेणार आहे.
40 आमदारांच्या पाठिंब्याने त्यांनी स्वतःला पक्षाध्यक्ष म्हणून घोषित केले. मात्र, अलीकडेच शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाने निवडणूक आयोगाला सांगितले होते की, पक्षात कोणताही वाद नसून, काही लोक वैयक्तिक फायद्यासाठी आणि महत्त्वाकांक्षेसाठी संघटनेपासून वेगळे होण्याचा प्रयत्न करत आहेत.