मुंबई,दि. १० ऑक्टोबर २०२३ – गुजरात सह राज्यभरात गरब्यावरुन नवा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण ‘गरबा कार्यक्रमात फक्त हिंदूंना प्रवेश द्या, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने केली आहे. प्रवेश देताना सर्वांचे आधार कार्ड तपासा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे.विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय सह सरचिटणीस डॉ.सुरेंद्र जैन यांनी आज गुजरातमधील कर्णावती (अहमदाबाद) येथे पत्रकार परिषदेत बोलताना असेही म्हटले की, एकीकडे आमच्या धार्मिक आणि सामाजिक प्रवासाला लक्ष्य केले जात आहे, तर दुसरीकडे आमचे हिंदू बहिणींना लक्ष्य केले जात आहे, मुलींना लव्ह जिहादच्या तावडीत अडकवले जात आहे. या मागणीला भाजप नेते नितेश राणे यांनी दुजोरा दिला आहे.विश्व हिंदू परिषदेच्या मागणीने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
गरब्यावरुन नवा वाद पेटलाय. कारण गरबा कार्यक्रमात फक्त हिंदूंना प्रवेश द्या. गरबा कार्यक्रमासाठी प्रवेश देताना सर्वांचे आधार कार्ड तपासा अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने केलीय. या मागणीनं नवा वाद निर्माण झालाय. गरबा कार्यक्रमात अनेक इतर धर्मीय तिथे प्रवेश घेतात आणि हिंदू महिला आणि तरुणींची छेड काढतात असा आरोप विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र आणि गोवा प्रांत मंत्री गोविंद शेंडे यांनीही केलाय.
विश्व हिंदु परिषदेच्या मागणीला नितेश राणे यांनी दुजोरा दिला आहे. दांडिया खेळायला येणारे हिंदू आहेत की नाही ते तपासा, अशी मागणी भाजप आमदार नितेश राणेंनी केलीय. तर शिंदे गटानेही नितेश राणेंच्या मागणीचं समर्थन केलंय.
दरम्यान या निर्णयानंतर खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टिका केली आहे. यापुढे मोदी मुस्लीम देशांच्या भेटीवर जाणार नाहीत का?असा सवाल त्यांनी केला.
प्रेस वक्तव्य:
बढ़ती जिहादी कट्टरता व लव जिहाद पर अविलम्ब अंकुश जरूरी: सुरेंद्र जैन
गरबा कार्यक्रमों में अनास्थवाना लोगों के प्रवेश पर प्रतिबन्ध का कड़ाई करना होगा पालनकर्णवती (गुजरात)। अक्टूबर 7, 2023। बढ़ती जिहादी कट्टरता भारत, भारतीयता व भारतीय संस्कृति के लिए खतरा है। शासन… pic.twitter.com/KmiT31gwnY
— Vishva Hindu Parishad -VHP (@VHPDigital) October 7, 2023