राज ठाकरेंच्या दणक्यानंतर सरकारला खडबडून जाग:टोलसंदर्भातील १० मोठ्या घोषणा

राज्यातील ४४ जुने टोलनाके बंद होणार ?; राज ठाकरेंना सरकारने काय दिलं आश्वासन ?

0

मुंबई,दि.१३ ऑक्टोबर २०२३ – राज्यातील रस्त्यांची खड्ड्यांनी चाळण झाली असताना टोल घेण्यास विरोध करत रस्त्यावर उतरलेल्या मनसेच्या आंदोलनाला यश येताना दिसत आहे.टोलचा मुद्द्यावरून आक्रमक झालेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज मंत्री दादा भुसे यांनी राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या शिवतीर्थावर सकाळी भेट घेऊन सुमारे २ तास चर्चा केली. त्यानंतर मंत्री दादा भुसेंसोबत  संयुक्त पत्रकार परिषद करत टोल संदर्भातील कोणते बदल होणार आहेत याची सविस्तर माहिती दिली.

पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी सांगितले की आता दिवसभरातटोल किती वसूल झाला किती बाकी आहे याची माहिती आता प्रदर्शित केली जाणार आहे. त्याचबरोबर मनसेकडून जुने टोल बंद करण्यासंदर्भातील मागणी राज्य सरकारकडे आणण्यात आली आहे.पीडब्ल्यूडीचे २९ आणि एमएसआरडीसीचे १५ जुने टोल बंद करा,अशी मागणी करण्यात आली आहे. राज्य सरकारने या संदर्भात विचार करून निर्णय घेऊ असं म्हटलं आहे.

पुढील १५ दिवसात मुंबईत सर्व एन्ट्री पॉईंट्सवर सरकार आणि मनसेकडून कॅमेरे लावले जातील. राज ठाकरेंकडून टोल बंद करण्यात संदर्भात मागणी करण्यात आली आहे, या संदर्भात निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारने एक महिन्याचा अवधी मागितला आहे.राज ठाकरेंकडून जुने टोल बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर आज मंत्री दादा भुसे यांनी टोल वसुलीबाबत अत्यंत महत्त्वाच्या घोषणा केल्या.जुने ४४ टोलनाके बंद करण्याबाबतही यावेळी मंत्र्यांनी सुतोवाच केलं.

राज ठाकरेंना सरकारनं दिलेली आश्वासनं पुढीलप्रमाणे…

वाढीव टोल रद्द करण्याबाबतचा निर्णय महिनाभरात घेण्याचं आश्वासन

राज्यातील ४४ जुने टोलनाके बंद करण्यासंदर्भात विचार करून निर्णय घेणार

रस्ते खराब असल्यास टोल घेतला जाणार नाही

टोलच्या माध्यमातून नेमके किती पैसे मिळाले याचा हिशेब दिला जाणार

दिवसभरात किती टोल जमा झाला याची माहिती देखील मिळणार

आनंद नगर ते ऐरोली दरम्यानचा टोल एकदाच भरावा लागणार. या निर्णयाची महिन्याभरात अंमलबजावणी होणार

पुढच्या १५ दिवसांत सर्व एन्ट्री पॉईंट्सवर सरकार आणि मनसेचे कॅमेरे लावले जातील. त्यातून गाड्यांची संख्या कळणार

करारामधील नमूद उड्डाण पूलांचे स्ट्रक्चरल ऑडिट आयआयटी मुंबई करणार

टोलनाक्यांवर स्वच्छतागृहांची सोय करणार. नागरिकांशी सौजन्याने वागण्याच्या सूचना टोल कर्मचाऱ्यांना देणार

टोलनाक्याजवळ राहणाऱ्यांना पास दिले जाणार

पिवळ्या रेषा मागे चार मिनिटं वाहन थांबल्यास टोल माफ होणार

वांद्रे सी-लिंक, एक्स्प्रेस वेच्या टोलवसुलीची कॅग मार्फत चौकशी करणार

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.