दिल्लीत पुन्हा भूकंपाचे धक्के

0

नवी दिल्ली,दि. १५ ऑक्टोबर २०२३ –राजधानी दिल्लीत एनसीआरमध्ये दोन आठवड्यात दुसऱ्यांदा भूकंपाचे धक्के जाणवले असून यामुळे नागरिकांमध्‍ये घबराट पसरली आहे दिल्लीत आज ( दि.१५) दुपारी चारच्या सुमारास भूकंपाचे धक्के (Earthquakes again in Delhi)जाणवले. दिल्लीसह, गाझियाबाद नोएडा याठिकाणी देखील भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. भूकंपाचे धक्के जाणवताच लोक घराबाहेर पडले.ऑफिस आणि मॉल्सच्या बाहेरही लोकांची गर्दी दिसत होती.

दिल्ली-एनसीआर भागात रविवारी (दि.१५) दुपारी ४ वाजून १० मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रत 3.1 रिश्टर स्केल इतकी होती. या भूकंपाचा केंद्रबिंदू हरियाणाच्या फरिदाबादपासून १३ किमी अंतरावर होता. भूकंपाच्या धक्क्याने नागरीकांमध्ये प्रचंड दहशद निर्माण झाली असून दिल्ली एनसीआरमधील नागरिकांचा घाबरून घराबाहेर धाव घेतली.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.