आजचा रंग -राखाडी

आपल्या ग्रुप चे फोटो जनस्थान ऑनलाईनला पाठवा. योग्य फोटो जनस्थान ऑनलाईन मध्ये प्रसिद्ध करण्यात येतील ..email – jansthan123@gmail.com अथवा 8329176681 या नंबर वर व्हाट्सअप करा
मुंबई,दि .२१ ऑक्टोबर २०२३ –भारतीय मनोरंजन क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडेने तिचा पती विकी जैन सोबत बिग बॉस १७ च्या घरात प्रवेश करून चर्चेत आले आहेत. डिसेंबर २०२१ मध्ये लग्न करणारे हे जोडपे या सीझनमधील सर्वाधिक चर्चेत असलेल्या स्पर्धकांपैकी एक आहेत पण टीव्ही आणि चित्रपटांमधील यशस्वी कारकीर्दीनंतर अंकिता लोकप्रिय रिअॅलिटी शोमध्ये का सामील झाली? तिने बिग बॉस मध्ये येण्याचा निर्णय का घेतला हे तिने स्वतःच स्पष्ट सांगितलं आहे.
अंकिताने बिग बॉस १७ मध्ये सहभागी होण्याच्या तिच्या निर्णयामागील खरे कारण उघड केले अंकिता म्हणते “मी बिग बॉस १७ शोमध्ये आलो आहे कारण लोक मला अर्चना म्हणून ओळखतात आता त्यांनी अंकिताला ओळखावे माझी खरी ओळख अंकिता म्हणून व्हावी अशी माझी इच्छा आहे. मी जशी आहे तस मला लोकांनी स्वीकारावं अस मला वाटत ”
अंकिता “पवित्र रिश्ता ” मधल्या अर्चना देशमुखच्या तिच्या प्रतिष्ठित भूमिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहचली.अंकिताने २००९ ते २०१४ पर्यंत पाच वर्षे अर्चनाची भूमिका केली आणि तिच्या अभिनयासाठी अनेक पुरस्कार आणि कौतुक मिळवलं. अंकिता लोखंडे ही बिग बॉस १७ मधील सर्वात लोकप्रिय आणि प्रिय स्पर्धकांपैकी एक आहे. तिला तिच्या चाहत्यांकडून आणि इंडस्ट्रीतील मित्रांकडून खूप पाठिंबा आणि कौतुक मिळत आहे. शोमध्ये तिच्या उपस्थितीने प्रेक्षक खऱ्या अंकिता लोखंडेला बघण्यासाठी उत्सुक आहेत