आजचा रंग -राखाडी

आपल्या ग्रुप चे फोटो जनस्थान ऑनलाईनला पाठवा. योग्य फोटो जनस्थान ऑनलाईन मध्ये प्रसिद्ध करण्यात येतील ..email – jansthan123@gmail.com अथवा 8329176681 या नंबर वर व्हाट्सअप करा
नाशिक,दि.२१ ऑक्टोबर २०२३ –समिज्ञा फाऊंडेशन ही सामाजिक स्तरावर कार्यरत असणारी नाशिक मधील अग्रगण्य संस्था. संस्थेतर्फे दरवर्षी नवरात्री उत्सवाचे औचित्य साधून नवदुर्गा पुरस्कार दिले जातात. विविध श्रेणीतील, विविध क्षेत्रातील नऊ महिलांना हे पुरस्कार दिले जातात.
ह्यावर्षी एकल मातृत्व ह्या(single mother award) श्रेणीतील , स्वतः ला सिद्ध करणाऱ्या आणि मुलांचे ही संगोपन करणाऱ्या नऊ मातांचा संस्थेतर्फे समिज्ञा नवदुर्गा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. मीरा ढवळे, मालती गायकवाड, सुनीता खर्डेकर, डॉ दीना चौहान, निर्मला खडके, विद्या शेरताटे, गौरी पाठक, नूरजहाँ शेख, जिजा गवळी ह्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. नगरसेविका अर्चनाताई थोरात, सुमन ताई भालेराव ह्यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले.
समिज्ञा फाऊंडेशन च्या सेक्रेटरी प्रज्ञा भोसले तोरसकर, अध्यक्ष समीर तोरसकर, खजिनदार सुनिल भोसले ह्याप्रसंगी उपस्थित होते. कार्यक्रमाचे औचित्य साधून महिला सभासदांसाठी गरबा नृत्याचे ही आयोजन करण्यात आले होते. माहिलना, बेस्ट ड्रेस, बेस्ट गरबा, ग्रुप गरबा इत्यादी बक्षीसे देऊन सन्मानित करण्यात आले नुपूर डान्स यांनी जज म्हूणन काम बघितले