दिवाळी खरेदीच्या आनंदमेळ्याचे आज होणार उदघाट्न
२७ ते ३० ऑक्टोबर पर्यंत नाशिककरांना एकाच ठिकाणी करता येणार दिवाळीची खरेदी
नाशिक,दि, २७ ऑक्टोबर २०२३ –दिवाळी पूर्वी खरेदीची लगबग सुरू झाली असून याचाच एक भाग म्हणून सखी संयोजीत आनंदमेळा (Diwali shopping)चे आयोजन कॅनडाकॉर्नर जवळील बी एस एन एल ऑफिस परिसरात करण्यात आले आहे.
आज शुक्रवार दि. २७ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ११ वाजता विश्वास बँकेचे अध्यक्ष विश्वास जयदेव ठाकूर यांचे हस्ते या आनंदमेळ्याचे उद्घाटन होणार आहे.यात फराळ,सजावटीचे साहित्य ,कपडे,भेटवस्तू, दागिने, आकाशकंदील विक्रीसाठी उपलब्ध आहेत.27,28,29,30 ऑक्टोबर रोजी रोज सकाळी 10 ते रात्री 8.30 या वेळात हे प्रदर्शन राहील
तरी जास्तीत जास्त संख्येने नाशिककरांनी भेट देण्याचे आवाहन सखी संयोजित इमेज २३ च्या आयोजकांनी केले आहे.