नाशिक ,दि.९ नोव्हेंबर २०२३ –गोरगरिब व रस्त्यालगत राहणाऱ्या लोकांमध्ये दिवाळी साजरी होत नाही. अशा व्यक्तीना दुजाभाव वाटू नये याकरिता सामाजिक बांधिलकी जपत दरवर्षीप्रमाणे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष व मदत फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अंबादास खैरे हे “एक कपडा एक करंजी” हा उपक्रम राबवीत आहे. यावेळी गरिबांना कपडे, महिलांना साड्या, फराळ व लहान मुलांना फटाक्यांचे वाटप करण्यात आले.
दिवाळीत घरोघरी उत्साहाचे वातावरण असते. प्रत्येक कुटुंब ऐपतीप्रमाणे दिवाळीचा आनंद साजरा करतात. पण गोरगरीब तसेच रस्त्यालगत राहणाऱ्या कुटुंबाना यापासून वंचित राहावे लागते. गोरगरिबांना किमान कपडे व गोडधोड मिळावे त्यांना दुजाभाव वाटू नये म्हणून दरवर्षीप्रमाणे “एक कपडा एक करंजी” उपक्रम मदत फाउंडेशन व राष्ट्रवादी युवक काँग्रेसने हाती घेतला आहे. या उपक्रमाअंतर्गत गरजू व्यक्तींना कपडे, महिलांना साड्या, फराळ तसेच लहान मुलांना कपडे व फटाक्यांचे वाटप करण्यात आले. सर्वसामान्य नागरिक दिवाळीला नवीन कपडे आवर्जून खरेदी करतो. तसेच प्रत्येक घरा-घरात दिवाळीत फराळ बनविण्यात येतो. नवीन कपडे खरेदी केल्यावर अपोआप जुन्या कपड्यांकडे दुर्लक्ष होते. हे जुने कपडे गरजवंताला उपयोगी पडतात. यामुळे अशा कुटुंबांकडून कपडे, फराळ व फटाके जमा करून गरजवंतापर्यंत पोहोचविण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे अंबादास खैरे यांनी सांगितले.
यावेळी मुकेश शेवाळे, अमोल नाईक, विशाल डोके, निलेश भंदुरे, संदीप गांगुर्डे, संदीप खैरे, निलेश जाधव, डॉ संदीप चव्हाण, संतोष भुजबळ, जितेंद्र जाधव, कुलदीप जेजुरकर, हर्षल चव्हाण, रियान शेख, आकाश हलदे, भावेश निर्वाण, समीर शेख आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.