घर आणि घराशी संबंधित अंतर्गत सजावटीचे असंख्य पर्याय एकाच छताखाली उपलब्ध

‘स्मार्ट हाऊस इंटेरियर एक्स्पो’ ची तयारी अंतिम टप्प्यात  गुरु पब्लिसिटी - दि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स यांच्यातर्फे आयोजन,स्टॉल बुकिंगला मोठा प्रतिसाद

0

नाशिक,१ डिसेंबर २०२३ –येथील गुरु पब्लिसिटी आणि दि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणाऱ्या दुसऱ्या ‘स्मार्ट हाऊस इंटेरियर एक्स्पो’ प्रदर्शनाची तयारी अंतिम टप्प्यात आल्याची माहिती मुख्य आयोजक तथा गुरू पब्लिसिटीचे संचालक रवी पवार यांनी दिली. उत्तर महाराष्ट्रातील या महत्तम प्रदर्शनाचे स्वरूप यावेळी अधिक भव्य आणि व्यापक राहणार असल्याचेही पवार म्हणाले. प्रदर्शनातील बहुतेक स्टॉल्स बुक झाले असून मोजकेच स्टॉल्स शिल्लक असल्याची माहितीही त्यांनी दिली.

गतवर्षी अभूतपूर्व प्रतिसाद लाभलेल्या या प्रदर्शनाचे सलग दुसऱ्या वर्षी आयोजन करण्यात येणार आहे. येत्या ८, ९ आणि १० डिसेंबर २०२३ रोजी सिटी सेंटर मॉल नजीक ठक्कर्स डोम येथे प्रदर्शन घेण्यात येईल. घर आणि घराशी संबंधित अंतर्गत सजावटीच्या असंख्य पर्यायांची एकाच छताखाली उपलब्धता, हे प्रदर्शनाचे खास वैशिष्ट्य राहणार आहे. त्यामध्ये इंटेरियर, एक्स्टेरियर, स्मार्ट होम, डेकॉर आर्ट, बिल्डींग मटेरियल्स या श्रेणींचा समावेश राहील. प्रदर्शनात उत्तर महाराष्ट्रातील नामांकित समूहांचा सहभाग निश्चित झाला आहे.
दरम्यान, प्रदर्शन स्टॉल बुकिंग आणि अधिक माहितीसाठी 97621117511 / 7620003930 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याशिवाय,फ्री व्हिजिटिंग पास करिता खालील वेबसाईटवर आपले नाव रजिस्टर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  https://www.smarthouseexpo.com/

 प्रदर्शन भागीदार असे….
गुरु पब्लिसिटी आयोजित ‘स्मार्ट हाऊस इंटेरियर एक्स्पो’ या प्रदर्शनात स्टोन्स एन स्टॅम्पिंग टायटल पार्टनर असून पॉवर्ड बाय बाय एम्बिओ किचन को-पॉवर्ड बाय एलोरा ग्रुप हे आहेत. लोकमत मीडिया पार्टनर, टीव्ही पार्टनर न्यूज 18 लोकमत, रेडिओ पार्टनर मिर्ची, हॉस्पिटेलिटी पार्टनर ट्रिट हॉटेल, होर्डिंग पार्टनर इशा पब्लिसिटी होम डेकोर पार्टनर प्रतिबिंब गिफ्ट अँड फ्लॉवर पॉईंट, लाइटिंग पार्टनर वैष्णवी इलेक्ट्रॉनिक्स, असोसिएट पार्टनर इंट्रो फर्निचर, सिनेमा मीडिया पार्टनर खुशी ऍडव्हर्टायझिंग, होम अप्लायन्सेस पार्टनर ओम पूजा इलेक्ट्रॉनिक्स, क्लिनिंग पार्टनर डस्टबस्टर म्हणून कार्यरत राहणार आहेत.

 गतवर्षी आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनातील प्रतिसाद पाहूनच यंदा त्याच्या आयोजनासाठी ऊर्जा प्राप्त झाली. घराच्या अंतर्गत सजावटी संदर्भातील सजगता आता मध्यम वर्गियांच्या मनातही डोकावत असल्याचे सिद्ध झाले आहे. यंदा नाशिककरांच्या मनातील पर्याय सादर होणार असल्याने उत्तम प्रतिसाद मिळेल, याबाबत विश्वास आहे.
– रवी पवार  गुरु पब्लिसिटी,  मुख्य आयोजक

आपलं घर सुंदर आणि आकर्षक पद्धतीने सजवण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या प्रकारच्या मटेरीअल्सचे प्रदर्शन ‘Smart House Interior Expo- 2023’ मध्ये, एकाच छताखाली बघायला मिळणार आहे. आपल्याला ते मटेरीअल्स बघता येतील, हाताळता येतील, अनुभवता येतील. पुण्या-मुंबईत इतक्याच उत्कृष्ठ दर्जाची, कलाकुसरीची आणि वाजवी दरातील सगळी संसाधने नाशकात उपलब्ध आहेत, हे देखील यानिमित्ताने बघता येईल. त्या अर्थाने; नाशिककरांनी, नाशिककरांचे आणि नाशिककरांसाठी भरवलेले हे प्रदर्शन आहे, असे देखील म्हणता येईल.

आर्की. रोहन जाधव
अध्यक्ष, आयआयए, नाशिक सेंटर

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!