नरेडकोच्या होमेथॉन प्रदर्शनाची तयारी पूर्ण…!

उद्या होणार उदघाटन :आपल्या घरकुलाचे स्वप्न साकार होणार

0

नाशिक,दि.२० डिसेंबर २०२३ –सर्वसामान्यांच्या स्वप्नातील व वाजवीदराच्या घरकुलाचे स्वप्न साकार करण्यासाठी नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल (नरेडको) तर्फे २१ ते २५ डिसेंबरपर्यंत  डोंगरे वसतीगृह मैदान येथे आयोजीत करण्यात आलेल्या होमेथॉन २०२३ प्रापर्टी एक्स्पोची तयारी अंतिम टप्प्यात असून युध्द पातळीवर डोमची उभारणी करण्यात येत आहे. २१ डिसेंबर ला सकाळी १० वाजे पासून प्रदर्शनाला सुरुवात होणार असून प्रदर्शनाचे औपचारिक उदघाटन  सायंकाळी ५ वाजता विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर, पोलीस आयुक्त संदिप कर्णिक,एन एम आर डी ए आयुक्त सतीश खडके,सह जिल्हा निबंधक  कैलास दवंगे, आदीं मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे अशी माहिती होमेथॉनचे मुख्य समन्वयक जयेश ठक्कर, अध्यक्ष अभय तातेड,सचिव सुनील गवादे ,सह समन्वयक शंतनू देशपांडे, भूषण महाजन यांनी दिली.

या प्रदर्शनाची तयारी अंतिम टप्प्यात असून आता सर्वांनाच या प्रदर्शनाची उत्सुकता  लागली आहे. या  प्रदर्शनात नाशिकसह मुंबई, पुणे तसेच विदर्भातील नामांकित बांधकाम व्यावसायिकांचाही सहभाग राहणार आहे. आपल्या स्वप्नातील घर घेणार्‍यांसाठी हे प्रदर्शन म्हणजे एक प्रकारची पर्वणीच ठरणार असून नाशिक, मुंबईसह नाशकातील नावाजलेल्या बांधकाम व्यावसायिकांच्या प्रॉपर्टीज एकाच छताखाली बघण्याची व ती खरेदी करण्याची संधी या प्रदर्शनामुळे नागरीकांना उपलब्ध होईल,अल्प व मध्यम उत्पन्न गटातील लोक केंद्रबिंदू धरून अगदी १५ लाखांपासून ते सुमारे ५ कोटी रुपयां- पर्यंतची घरे या प्रदर्शनात नागरीकांना खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. प्रदर्शनाचे उदघाटन  सांयकाळी ५ वाजता होणार असले तरी, नागरिकांना सकाळी १० वाजेपासूनच प्रदर्शन खुले असणार आहे असेही आयोजकांतर्फे सांगण्यात आले. पाचही दिवस सकाळी १० ते रात्री ८ पर्यंत  हे प्रदर्शन खुले राहणार आहे.

प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक म्हणून दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे चेअरमन दीपक चंदे, पॉवर्ड बाय ललित रुंगठा ग्रुप बिल्डर्स अँड डेव्हलपर्स हे लाभले असून सह प्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र तसेच एल.आय.सी.हौसिंग तसेच ऑनलाईन पार्टनर म्हणून हौसिंग डॉट कॉमचे सहकार्य लाभले आहे.

या प्रदर्शनाच्या डोम उभारणीच्या कामाच्या पाहणी प्रसंगी अध्यक्ष अभय तातेड नरेडकोचे होमेथॉन प्रदर्शनाचे मुख्य समन्वयक जयेश ठक्कर, सह समन्वयक शंतनू देशपांडे,भूषण महाजन सचिव सुनील गवादे यांच्यासह अभय नेरकर ,प्रशांत पाटील,पुरुषोतम देशपांडे,राजेंद्र बागड,अश्विन आव्हाड,अविनाश शिरोडे,,शशांक देशपांडे,नितिन सोनवणे,मयूर कपाटे,उदय  घुगे, भाविक ठक्कर, आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

रजिस्ट्रेशन अनिवार्य
प्रदर्शनाला भेट देण्यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जाणार नाही मात्र प्रवेश करण्यापूर्वी  नागरीकांना क्यू आर कोड द्वारे रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे. सदर प्रदर्शन हे डोंगरे वसतिगृह मैदानावर २१ ते २५ डिसेंबर पासून नागरीकांना खुले असून जास्तीतजास्त नागरीकांनी प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

बुकिंगला चांदीचे नाणे भेट
महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणत्याही स्टॉलवर घर बुक करणार्‍यास नरेडकोतर्फे चांदीचे नाणे भेट देण्यात येणार आहे.प्रदर्शनास भेट देण्यास येणार्‍यांनाही नरेडकोतर्फे लकी ड्रॉद्वारे एक भेट मिळणार आहे. घर खरेदी करणार्‍यांसाठी गृह कर्जाचेही विविध पर्याय या ठिकाणी उपलब्ध असणार आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.