‘होमेथॉन २०२३ ’प्रॉपर्टी एक्स्पोचा आज भव्य शुभारंभ
घराचे स्वप्न साकार करण्याची सुवर्णसंधी:नाशिकसह मुंबई,पुणे,विदर्भातील बांधकाम व्यावसायिकांचा असेल सहभाग
नाशिक,दि .२१ डिसेंबर २०२३ –नरेडकोच्या होमेथॉन २०२३ प्रॉपर्टी एक्स्पो प्रदर्शनाचा आज (दि.२१) पासून शुभारंभ होत आहे.सर्वसामान्यांच्या स्वप्नातील व वाजवी दराच्या घरकुलाचे स्वप्न साकार करण्यासाठी नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल (नरेडको)तर्फे २१ ते २५ डिसेंबरपर्यंंत सकाळी १० ते रात्री ८ पर्यंत होमेथॉन २०२३ प्रॉपर्टी एक्स्पो प्रदर्शन गंगापूर रोडवरील डोंगरे वसतीगृह मैदान येथे आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनात गृह स्वप्नपूर्तीची सुवर्णसंधी नरेडकोने उपलब्ध करून दिली असून नाशिककरांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी असे आवाहन प्रदर्शनाचे मुख्य समन्वयक जयेश ठक्कर, अध्यक्ष अभय तातेड,सचिव सुनील गवादे ,सह समन्वयक शंतनू देशपांडे, भूषण महाजन यांनी केले आहे.
प्रदर्शनाचे उदघाटन विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते होणार असून प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी जलज शर्मा, महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर, पोलीस आयुक्त संदिप कर्णिक,एन एम आर डी ए आयुक्त सतीश खडके,सह जिल्हा निबंधक कैलास दवंगे, आदीं मान्यवर उपस्थित राहणार आहेत. आपल्या स्वप्नातील घर व्हावे त्यांच्यासाठी हे प्रदर्शन म्हणजे एकप्रकारची पर्वणीच असून नाशिक, मुंबईसह नामवंत बांधकाम व्यावसायिकांच्या प्रॉपर्टीज एकाच छताखाली बघण्याची व ती खरेदी करण्याची संधी या प्रदर्शनामुळे उपलब्ध होईल, अपार्टमेंट्स, शॉप्स, ऑफिसेस यासाठी स्मार्ट सिटी नाशिक मध्ये गुंतवणूक करण्याची ही योग्य संधी आहे.सर्वांना परवडणारी घरे या प्रदर्शनात असणार असून १५ लाखांपासून ते ५ कोटी पर्यंतची घरे या प्रदर्शनात नागरीकांना खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.
हे प्रदर्शन म्हणजे एकप्रकारची पर्वणीच असून मुंबईसह नाशकातील नावाजलेल्या बांधकाम व्यावसायिकांचे सगळे प्रकल्प एकाच छताखाली ग्राहकांना नरेडकोच्या या प्रदर्शनात बघायला मिळणार आहेत. बुकिंग करणार्या ग्राहकांना इथे विशेष सवलती असतील, बँकिंग पार्टनर्स देखील ग्राहकांना विशेष सवलत देणार आहेत. स्पॉट बुकिंग करणार्या प्रत्येक ग्राहकाला एक चांदीचं नाणं या ठिकाणी भेट मिळणार आहे जितके लोक एक्झिबिशन बघायला येतील त्यापैकी एका भाग्यवंताला दररोज दर तासाला भेटवस्तू देण्यात येणार आहे. प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक म्हणून दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे चेअरमन दीपक चंदे, पॉवर्ड बाय ललित रूंग्ठा ग्रुप बिल्डर्स अँड डेव्हलपर्य हे लाभले असून सह प्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र तसेच एल.आय.सी.हौसिंग तसेच ऑनलाईन पार्टनर म्हणून हौसिंग डॉट कॉमचे सहकार्य लाभले आहे.
होमेथॉन प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी मुख्य समन्वयक जयेश ठक्कर,सह समन्वयक शंतनू देशपांडे,भूषण महाजन सचिव सुनील गवादे यांच्यासह भाविक ठक्कर, ,प्रशांत पाटील,पुरुषोतम देशपांडे,राजेंद्र बागड,अश्विन आव्हाड,अविनाश शिरोडे,,शशांक देशपांडे,नितिन सोनवणे,मयूर कपाटे,उदय घुगे,अभय नेरकर ,आदी प्रयत्नशील आहेत.
सकाळपासूनच प्रदर्शन खुले
प्रदर्शनाचे औपचारिक उदघाटन सांयकाळी ५ वाजता होणार असले तरी, नागरिकांना सकाळी १० वाजेपासूनच प्रदर्शन खुले असणार आहे. २१ ते २५ डिसेंबर दरम्यान पाचही दिवस सकाळी १० ते रात्री ८ पर्यंत हे प्रदर्शन खुले राहणार आहे. प्रदर्शनासाठी नाव रजिस्ट्रेशन अनिवार्य करण्यात आले असून प्रदर्शनाच्या ठिकाणी स्वागत कक्षाजवळ रजीस्ट्रेशनची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.प्रदर्शनाच्या बाहेरील बाजूस भव्य पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. आर्कि संजय म्हाळस यांनी डोमचे डिझाईन प्रदर्शनची सुंदर रचना केली आहे
अभिनेत्री प्रार्थना बेहरेची शुक्रवारी प्रकट मुलाखत
या प्रदर्शनाची ब्रँड अँबेसेडर म्हणून सुप्रसिध्द अभिनेत्री प्रार्थना बेहरे असून या शुक्रवार दि.२२ रोजी सायंकाळी ५:३० वाजता ती प्रदर्शनाला भेट देणार असून यावेळी नंदन दीक्षित आणि किशोरी किणीकर हे प्रार्थना बेहरेची प्रकट मुलाखत घेणार आहे. त्यामुळे त्यांना ऐकण्याची संधी नाशिककरांना या प्रदर्शनाच्या माध्यमातून मिळणार आहे.
मुंबई, पुण्यासह विदर्भातील बांधकाम व्यावसायिकांचा सहभाग
केवळ नाशिकच नव्हे तर मुंंबई, पुण्यातील बांधकाम व्यावसायिक तसेच विदर्भातील बांधकाम व्यावसायिकांचाही या प्रदर्शनात सहभाग असणार असून नाशिकसोबतच मुंबई, पुण्यामध्ये प्रॉपर्टी खरेदी करण्याची संधी यानिमित्ताने नाशिककरांना मिळणार आहे.