होमेथॉन प्रदर्शनात तीन दिवसांत तब्बल ४२ हजार नागरिकांनी दिली भेट :२०३ प्रॉपर्टीचे बुकिंग

प्रदर्शनाचा उद्या समारोप

0

नाशिक,दि.२४ डिसेंबर २०२३ –नरेडकोच्यावतीने आयोजीत होमेथॉन २०२३ प्रॉपर्टी एक्स्पोला शनिवार (दि.२३) रोजी केंद्रिय अर्थराज्यमंत्री भागवत कराड, केंद्रिय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार आदी मान्यवरांनी भेट दिली. विशेष म्हणजे या प्रदर्शनास प्रचंड प्रतिसाद लाभला असून गेले ३ दिवस या प्रदर्शनाला सुमारे ४२ हजारहून अधिक नागरिकांनी भेट दिली असून ३ दिवसात सुमारे २०३ ग्राहकांनी घर आणि शॉपचे बुकिंग केले आहे.नाशिककरांच्या या प्रतिसादाबददल स्टॉलधारकांनीही समाधान व्यक्त करत नरेडकोने जे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे त्याचे कौतूक केले.

सर्वसामान्यांच्या स्वप्नातील घरकुलाचे स्वप्न साकार करण्यासाठी नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल (नरेडको) तर्फे दि. २१ ते २५ डिसेंबरपर्यंत सकाळी १० ते रात्री ८ असे पाच दिवसांचे ‘होमेथॉन प्रदर्शन’ नाशिक शहरातील गंगापूररोडवरील डोंगरे वसतिगृह मैदान येथे आयोजित करण्यात आले असून प्रदर्शनाच्या आजच्या तिसरया दिवशी नागरिकांनी उर्त्स्फुत प्रतिसाद देत सकाळपासूनच प्रदर्शनाला भेट देण्यासाठी गर्दी केल्याचे दिसून आले. या प्रदर्शनात १५ लाख ते १२ कोटी रूपयांपर्यंतच्या घरांचे पर्याय नागरिकांसाठी उपलब्ध असल्याने नागरिकांचा प्रदर्शनाला प्रतिसाद लाभत आहे. इतकेच नव्हे तर मुंबई, पुणे, विदर्भातील नामांकित बांधकाम व्यावसायिकही या प्रदर्शनात सहभागी झाले असून येथील स्टॉल्सलाही नागरिक भेट देत आहे.

यावेळी केंद्रिय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांनी प्रदर्शनाला भेट देत विविध स्टॉल्सला भेटी दिल्या.यावेळी नरेडको च्या वतीने डॉ.पवार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलतांना डॉ. पवार म्हणाल्या की, नरेडकोच्या माध्यमातून एक चांगले व्यासपीठ बांधकाम व्यावसायिक आणि नागरिकांना उपलब्ध करून दिले आहे. घर घेण्याचे प्रत्येकाचेच स्वप्न असते परंतू ते कुठे घ्यावे, कसे घर घ्यावे याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम असतो परंतू या प्रदर्शनाच्या माध्यमातून नागरिकांना आपल्याला परवडणार्‍या दरात घर घेण्याचे आपले स्वप्न पुर्ण करता येणार आहे. याबददल नरेडकोचे खुप खुप अभिनंदन की त्यांनी नाशिककरांच्या गरजा, आवडी विचारात घेऊन येथे गृह प्रकल्पांचे पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. जेव्हा विविध गृह प्रकल्पांना भेटी दिल्या तेव्हा असे लक्षात आले की, नाशिक खुप बदलतयं, खुप चांगल्या प्रकारच्या सुविधा या शहरात निर्माण होताहेत. मुंबई, पुण्याच्या नागरिकांनाही गुंतवणूकीसाठी हे शहर खुणावतयं याचा आनंद वाटला. शहरात जे गृह प्रकल्प सुरू आहेत त्यामध्ये दिल्या जाणार्‍या सुख सुविधांही अतिशय सुंदर आहे. त्यामुळे नाशिककरांनी एकदा अवश्य या प्रदर्शनाला भेट देवून आपल्या घराचे स्वप्न पूर्ण करावे असे मी आवाहन त्यांनी नाशिककरांना केले.

Naredco Homethon Exhibition/As many as 42 thousand citizens visited the Homethon exhibition in three days: 203 properties were booked

प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक म्हणून दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे चेअरमन दीपक चंदे, पॉवर्ड बाय रूंग्ठा बिल्डकॉनचे ललित रूंग्ठा हे लाभले असून सह प्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र तसेच एल.आय.सी.हौसिंग तसेच ऑनलाईन पार्टनर म्हणून हौसिंग डॉट कॉमचे सहकार्य लाभले आहे.  होमेथॉन प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी  नरेडकोचे अध्यक्ष अभय तातेड  मुख्य समन्वयक जयेश ठक्कर,सह समन्वयक शंतनू देशपांडे,भूषण महाजन सचिव सुनील गवादे यांच्यासह भाविक ठक्कर ,प्रशांत पाटील,पुरुषोतम देशपांडे,राजेंद्र बागड,अश्विन आव्हाड,अविनाश शिरोडे,,शशांक देशपांडे,नितिन सोनवणे,मयूर कपाटे,उदय  घुगे, हर्षल धांडे,अभय नेरकर,आदी प्रयत्नशील आहेत.

सर्वसामान्य ते उच्चभ्रू नागरिकांसाठी पर्वणी
या प्रदर्शनात सर्वसामान्य ग्राहक ते उच्चभ्रू नागरिकांसाठी त्यांच्या आवडीनुसार गृह प्रकल्पांचे पर्याय उपलब्ध करून दिल्याने नागरिकांनी नरेडकोच्या या आयोजनाबददल समाधान व्यक्त केले आहे. प्रदर्शनाच्या तिसरया दिवशी सुमारे १८ हजाराच्या वर नागरिकांनी भेट देत गृह प्रकल्पांची माहिती घेतली. प्रदर्शनाचा सोमवार (दि.२५) रोजी समारोप होणार असून नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन नरेडकोच्यावतीने करण्यात आले आहे.

नाशिक शहरात दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्सच्या माध्यमातून रहिवासी आणि व्यावसायिक असे अनेक प्रकल्प सुरू आहेत. तसेच पाच  प्रकल्प येत्या नविन वर्षात येऊ घातले आहेत. होमेथॉनच्या माध्यमातून नागरिकांना दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे विविध प्रकल्प सादर करण्यात आले आहे. नागरिकांना हे प्रकल्प पाहण्याची संधीही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
देवश्री चंदे,संचालिका,दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स

नरेडकोच्यावतीने आयोजीत होमेथॉनचे प्रदर्शनात ललित रुंगठा ग्रुपचे सर्व प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात आले आहे.नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट देऊन रुंगठा ग्रुपच्या स्टॉलला भेट द्यावी. या ठिकाणी १८ लाखापासून शॉप्स तर ४० लाखांपासून टू बीएचके फलॅट उपलब्ध आहेत. या ठिकाणी ग्राहकांना सर्व प्रकल्पांची माहिती देण्यात येत आहे.
रोहित राजपूत,व्यवस्थापक ललित रूंग्ठा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स

Naredco Homethon Exhibition/As many as 42 thousand citizens visited the Homethon exhibition in three days: 203 properties were booked
स्पॉट बुकिंग केल्यावर इ-सायकल भेट
पॅसिफिक बिल्डर्सचा अभिनव उपक्रमपॅसिफिक बिल्डर्सने काठेगल्ली येथे प्रभु काउंटी गृहप्रकल्प सुरू करण्यात आला आहे. येथे ७५ फलॅट, रो हाउस उपलब्ध करून देण्यात आले आहे. नरेडकोच्या वतीने आयोजीत होमेथॉन प्रदर्शनात आमच्या प्रकल्पात बुकिंग करणार्‍या ग्राहकांना  पॅसेफिक बिल्डरच्यावतीने ई सायकल भेट देण्यात येणार आहे. पर्यावरण जनजागृती व्हावी या उददेशाने तसेच सायकल चळवळ रूजावी या उददेशाने ही एक भेट ग्राहकांसाठी आम्ही देत आहोत.
प्रशांत पाटील, संचालक पॅसेफिक बिल्डर

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.