नाशिकरोड -शिर्डी प्रस्तावित लोहमार्गाच्या सर्वेक्षणाचे काम तातडीने रद्द करा
शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाची खा.गोडसे यांच्याकडे मागणी
नाशिक,दि,४ जानेवारी २०२४ – शिर्डी या प्रस्तावित लोहमार्गाच्या नव्याने सर्वेक्षणाचे काम सुरू झाले आहे.प्रस्तावित लोहमार्गा देवळाली कँम्प,चेहडी,चाडेगाव,मोहगाव,बाभळेश्वर,चांदगिरी, जाखोरी या गावांमधील शिवारातून जाणार असल्याने अल्पभुधारक शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर अन्याय होणार आहे.या जमिनींच्या ऐवजी सदर प्रस्तावित लोहमार्ग पुर्वी सर्वेक्षण झालेल्या जमिनींमधून जावा असे स्पष्ट करत नव्याने सुरू करण्यात आलेल्या जमिनींवरील सर्वेक्षण तातडीने बंद करावे अशी आग्रही मागणी शेतकऱ्यांच्या एका शिष्टमंडळाने खा.गोडसे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
गेल्या काही वर्षांपासून नाशिकरोड- शिर्डी या दरम्यान प्रस्तावित लोहमार्ग आहे.सदर लोहमार्ग पुर्वी इंडिया बुल्स कंपनी करीता संपादित झालेल्या जमिनीतून प्रस्तावित होता.यामुळे नाशिकरोड -शिर्डी या रस्त्याचे अंतर 30 किलोमिटरने कमीही होणार होते.असे असले तरी नाशिकरोड – शिर्डी या दरम्यानच्या प्रस्तावित लोहमार्गासाठी गेल्या काही दिवसांपासून नव्याने देवळाली कँम्प, चेहडी, चाडेगाव, मोहगाव, बाभळेश्वर, चांदगिरी, जाखोरी या गावांच्या शिवारातील जमिनीचे सर्वेक्षण सुरू झाले आहे.सर्वेक्षण सुरू असलेल्या गावांमधील शेतकऱ्यांच्या जमिनी यापुर्वी शासनाच्या विविध प्रकल्पात गेलेल्या असल्याने येथील शेतकरी अल्प भूधारक झालेले आहेत.
तरी नव्याने सुरू करण्यात येत असलेले सर्वेक्षण तातडीने रद्द करावे अशी आग्रही मागणी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने खा.गोडसे यांच्याकडे केली आहे. शिष्टमंडळात नगरसेवक पंडित आवारे, नितिनदादा खर्जुल, संतोष साळवे, बाजीराव भागवत, योगेश टिळे, माणिक मानकर, रामभाऊ अस्वले,रवि जाधव, राजाभाऊ जाधव, निशांत भोर, युवराज जगळे, कैलास टिळे, अंकुश टिळे, समाधान टिळे, सुनिल टिळे, लखन टिळे, बंडू टिळे, चिंतामण टिळे, बाळासाहेब टिळे, संजय टिळे, शिवाजी टिळे,अनिल टिळे, ज्ञानेश्वर टिळे, मोहन टिळे, बबन टिळे, कचरू टिळे, किरण टिळे आदि शेतकऱ्यांचा समावेश होता.