वार्षिक राशिभविष्य,जानेवारी २०२४ ते डिसेंबर २०२४ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक.

0

जानेवारी २०२४ ते डिसेंबर  २०२४ वार्षिक राशिभविष्य.

मेष:-वर्षाच्या सुरुवातीला तुमच्याच राशीत गुरुदेव विराजमान आहेत. २१ एप्रिलला गुरू हर्षल युती होईल. त्या कालावधीत निर्णय चुकण्याची शक्यता  आहे. मे महिन्यानंतर कौटुंबीक सुखात  वाढ होईल. धन संपत्ती वाढेल. दीर्घकालीन फायदा देणाऱ्या घटना घडतील. अनुकूल शनी तुमची भरभराट करेल. मात्र आर्थिक नियोजन योग्य पद्धतीने करा. कुलदेवतेचे दर्शन घेणे लाभदायक ठरेल.

वृषभ:-सध्या तरी संमिश्र ग्रहमान आहे. राहूचे अनुकूलता वर्षभर साथ देईन. जल पर्यटन किंवा विदेश व्यापारात लाभ होतील. पाणथळ जागेजवळ भाग्योदय होईल. सरकारी कर्मचाऱ्यांनी सावधपणे नोकरी करावी. चुकीचे काम केल्यास मोठी शिक्षा भोगावी लागू शकते. एप्रिल महिन्यात जास्त सावधानता बाळगावी. इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रिक वस्तूंपासून काळजी घ्यावी. मे महिन्यात परिस्थिती सुधारेल. दानधर्म जरूर करावा. खुश खबर मिळेल. विवाह इच्छुकांना चांगली बातमी मिळेल. नोकरीत संयम बाळगल्यास पुढे लाभदायक ठरेल.

मिथुन:- वर्षाची सुरुवात अत्यंत चांगली होणार आहे. गुरू आणि हर्षल अनुकूल आहेत. या वर्षात सुरुवातीला अनेक चांगल्या घटना घडतील. स्वप्ने साकार होतील. अचानक लाभ होतील. आर्थिक बाबतीत भाग्यवान ठराल. २१ एप्रिल दरम्यान लॉटरी/शेअर्स यात यश मिळेल. नोकरी करणाऱ्याना  वर्ष फारसे समाधानकारक असणार नाही. मात्र काही उत्साह वर्धक घटना घडतील. मे महिन्यानंतर गुरू व्यय स्थानी येतील. खर्च वाढेल. आध्यात्मिक लाभ होतील. तीर्थयात्रा घडेल. विवाह पुढे ढकलले जातील. श्री. दत्तगुरु उपासना लाभदायक ठरेल.  

कर्क:- हे वर्ष तुम्हाला भरभराटीचे आणि आनंदाचे जाणार आहे. मूळच्या प्रेमळ आणि धार्मिक स्वभावाला साजेसा कालावधी आहे. अनुकूल गुरुदेव तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. बेरोजगार युवकांना नोकरी लागेल. अडचणी दूर होतील. विदेश पर्यटन घडेल. उच्च शिक्षणात यश मिळेल. वारसा हक्काने लाभ होतील. वास्तू खरेदी होऊ शकते. एप्रिल महिन्यात नोकरीत काही पेच प्रसंग निर्माण होऊ शकतात मात्र काळजीचे कारण नाही. शेवटचे सहा महिने अधिक अनुकूल आहेत. मात्र एखाद्या प्रिय व्यक्तीचा दुरावा होऊ शकतो. त्यासाठी काळे वस्त्र आणि अन्नदान करावे.

सिंह:- प्रगती करण्यासाठी अत्यंत अनुकूल कालावधी आहे. विद्यार्थ्यांना यश देणारे ग्रहमान आहे. शिक्षणासाठी परदेशी जाणे होईल. वारसा हक्काने संपत्ती मिळेल. आर्थिक अडचणी दूर होतील. पैशांची तजवीज होईल. कोर्ट कामात यश मिळेल. शत्रू पराभूत होतील. लक्ष्मी प्रसन्न राहील. नोकरीत आणि व्यवसायात प्रगती होईल. नवीन व्यवसाय सुरू कराल. भागीदारी व्यवसायात वाद निर्माण होऊ शकतात. पत्नीशी संबंध बिघडणार नाहीत याची काळजी घ्या. आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. छोट्या दुखण्याकडे दुर्लक्ष करू नका. शब्द देताना जपून द्या. कर्जे टाळा.

कन्या:- वर्षाच्या पूर्वार्धात अकस्मात लाभाच्या संधी आहेत. भूमिगत द्रव्यातून लाभ होतील. गुप्त शत्रू पराभूत होतील. पत्नीच्या माहेर कडून लाभ होतील. एप्रिल दरम्यान एखादी अप्रिय बातमी समजू शकते. मे महिन्यात परदेश प्रवासाचे योग आहेत. तुमच्या राशीतील केतू काही प्रसंगी भ्रमित करू शकतो. उत्तरार्धात लक्ष्मीची कृपा राहील. वर्षभर केतूचा जप करावा.                    

तुळ:- वर्षाचा पूर्वार्ध अत्यंत अनुकूल आहे. तरुण विवाह इच्छुकांना खुश खबर मिळेल. न्यायालयीन लढाईत यश मिळेल. हरवलेल्या मौल्यवान वस्तू आणि क्षण सापडतील. प्रिय व्यक्ती भेटतील. पत्नीची उत्तम साथ लाभेल. नात्यातून लाभ होतील. आत्मविश्वास वाढेल. भागीदारी व्यवसायात प्रगती होईल. महत्वाचे करार मे महिन्यांपूर्वी पूर्ण करावेत. काही निरर्थक खर्च अचानक  सामोरे येऊ शकतात. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. किरकोळ दुखण्याकडे दुर्लक्ष नको. 

वृश्चिक:- जमीन व्यवसाय, खनिज पदार्थांचे व्यवसाय यांना हा कालावधी चांगला जाणार आहे. व्यावसायिक वाढ होईल. मे महिन्या पर्यंत अधून मधून काही चिंता निर्माण होतील. नोकरीत बदली होण्याचे संकेत आहेत. प्रिय व्यक्तीच्या बाबतीत दुरावा निर्माण होण्याची भीती आहे. मे महिन्यानंतर परिस्थिती बदलेल. काळजी दूर होईल. राजमान्यता मिळेल. प्रशासकीय कामकाजात यश येईल. राजकीय क्षेत्रात घोडदौड चालू राहील. जून महिन्यातील हर्षल चे राशी भ्रमण भागीदारी व्यवसायिकांना मोठे बदल करण्यास भाग पाडेल. या कालावधीत नवीन व्यवसायास सुरुवात करू नये. वर्षाचा उत्तरार्ध काही चांगल्या बातम्या घेऊन येईन. अनुकूल केतू तुम्हाला मान सन्मान देईन. तुमचे कार्य नावाजले जाईल. प्रसिद्धी मिळेल. 

धनु:- हे वर्ष तुम्हाला अत्यंत अनुकूल असणार आहे. ग्रहमान तुम्हाला अनेक सुखद धक्के देईन. स्वप्ने पूर्ण होतील. ऐश्वर्य प्रदान करेन. नवं विवाहित दाम्पत्याना संतती लाभाच्या बाबतीत गोड बातमी मिळेल. विद्यार्थ्यांना उत्तम यश मिळेल. परदेश प्रवास घडतील. उच्च शिक्षणात गती प्राप्त होईल. मे महिन्या पर्यंत अतिशय अनुकूल कालावधी आहे. त्याचा सर्वार्थाने लाभ घ्यावा. आर्थिक नियोजन काटेकोरपणे करावे. बचतीचे मार्ग महत्वाचे ठरणार आहेत.  गृह कलह मात्र टाळावेत. नोकरीत किरकोळ कुरबुरी होऊ शकतात. उत्तरार्धात आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. मात्र योग्य काळजी घेतल्यास सर्वकाही ठीक होईल. वाहन जपून चालवावे. श्री. दत्तगुरूंची उपासना लाभदायक ठरेल.

 
मकर:- वर्षाची सुरुवात काहीशी संथ असणार आहे. मात्र नैराश्य झटकून कामाला लागावे लागेल. मेहनत घेतल्यास यश नक्की मिळेल. सुरुवातीला शनी देव आणि गुरू देव यांची अनुकूलता नाही. मात्र श्री. हनुमान उपासना केल्यास बराच सकारात्मक फरक पडू शकेल. एप्रिल महिन्या दरम्यान राहत्या घरासंबंधीत काही प्रश्न निर्माण होऊ शकतात. या काळात वाहन जपून चालवावे. मातेची सेवा करावी. जून महिन्यापासून प्रगतीचा वेग वाढेल. मनस्वास्थ्य लाभेल. अडचणी दूर होऊ लागतील. उत्साह वाढवणाऱ्या घटना घडतील. मात्र प्रिय व्यक्तीचा दुरावा सहन करवा लागू शकतो. काही कारणाने प्रिय व्यक्ती दूरदेशी जाईल. 

कुंभ:- सुरुवातीला अनुकूल असलेले गुरुदेव तुम्हाला सौख्य प्रदान करतील. अचानक लाभाचे प्रसंग येत राहतील. शेअर्स इत्यादी सारख्या माध्यमातून आर्थिक कमाई करू शकाल. आध्यत्मिक लाभाच्या दृष्टीने देखील ग्रहमान चांगले आहे. संशोधक वृत्तीच्या व्यक्तींना उत्तम यश मिळेल. एखाद्या अनामिक भीतीने तुम्हाला ग्रासलेले असेल. मात्र श्री. हनुमान उपासना लाभदायक ठरेल. साडेसातीचा त्रास फारसा जाणवणार नाही. भविष्यातील मार्ग संबंधित अचूक मार्गदर्शन मिळेल. एप्रिल महिन्यात नात्यात गैरसमज संभवतात. लेखकांनी या कालावधीत काळजी घ्यावी. वादग्रस्त लेखन करू नये. मे महिन्या नंतर आर्थिक आवक वाढणार आहे. नवनवीन व्यवसाय सुरू कराल. मात्र खर्चात वाढ होऊ शकते. नियमित व्यायाम आणि पथ्ये यांकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. अष्टम स्थानी असलेल्या केतूचा परिणाम फारसा चांगला नसेल. केतूचा नियमित जप करावा. जून नंतर चतुर्थात येणाऱ्या हर्षलचे संमिश्र परिणाम अनुभवास येतील. 

मीन:-राशीस्वामी गुरू धन स्थानात आहेत. ते आर्थिक कमतरता येऊ देणार नाहीत. व्यवसायात वाढ होईल. कौटुंबिक सौख्य लाभेल. शुभ घटना घडतील. धार्मिक कार्यात भाग घ्याल. तीर्थयात्रा घडेल. स्थावर संपत्तीत वाढ होईल. विशेष विद्यार्जन कराल. गूढ उलगडतील. एप्रिल दरम्यान अचानक लाभ होतील. मे महिन्यात एखादी मोठी शुभ घटना अनुभवाल. सप्तम स्थानातील केतू कामाचा वेग वाढवेल. जून महिन्यातील हर्षल भ्रमण तुमची महत्वाकांक्षा वाढवेल. पराक्रम गाजवाल. मित्रांकडून लाभ होतील. वर्ष अखेरीस हर्षल पुन्हा मूळ ठिकाणी येईल. ऑक्टोबर पासून वक्री हर्षल आयुष्यात चढ उतार निर्माण करू शकतात. 
सायन ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक. 8087520521

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.