ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
पौष शुक्ल अष्टमी. हेमंत ऋतू.शोभन नाम संवत्सर.
राहुकाळ – दुपारी १.३० ते दुपारी ३.००
“आज सकाळी ९.०० नंतर चांगला दिवस आहे”*दुर्गाष्टमी,शाकंभरी देवी उत्सव आरंभ*
चंद्र नक्षत्र – अश्विनी.
आज जन्मलेल्या बाळाची राशी – मेष.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) शुभ योग करणारा स्वराशीतील चंद्र नवीन आव्हाने आणि संधी निर्माण करेन. तुम्ही त्यात यशस्वी व्हाल.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) संमिश्र दिवस आहे. व्यवसाय करताना नैतिकता सोडू नका. प्रवासातून लाभ होतील.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) अत्यंत अनुकूल दिवस आहे. वेळ दवडू नका. धार्मिक कार्यातून आनंद मिळवाल.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) उद्योग/ व्यवसायात उत्तम यश मिळेल. अर्थकारण मजबूत होईल. दीर्घकालीन लाभ होतील.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) अनेक दिवसांचे स्वप्न आज साकार होईल. इष्ट देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतील. तीर्थाटन घडेल.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) साधारण कालावधी आहे. प्रगतीची दारे उघडली जातील. मात्र खर्चात वाढ होईल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) जोडीदाराच्या सहकार्याने मोठी मजल माराल. विवाह इच्छुकांना खुश खबर मिळेल.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) चंद्र गुरू युती आहे. पवित्र कामासाठी वेळ द्यावा लागेल. एखादे संकट थोडक्यात टळेल.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) सर्वार्थाने अनुकूल दिवस आहे. शेअर्स मध्ये नशीब अजमवण्यास हरकत नाही. संतती बाबत खुश खबर मिळेल.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) स्वतःच्या वास्तूचे स्वप्न पूर्ण होईल.मौल्यवान खरेदीचे योग आहेत. मात्र अति आत्मविश्वास नको.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) तृतीय स्थानातील चंद्र गुरू युती धाडस आणि पराक्रम बहाल करतील. लेखकांना यश मिळेल.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) गोड बोलल्याने बरीच कामे साध्य होतील. कर्जे मंजूर होतील. स्थावर संपत्तीत वाढ होईल.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या.”राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)
