आज रात्री पर्यंत अध्यादेश द्या,तो पर्यंत इथून हलणार नाही : मनोज जरांगे पाटील 

पूर्ण आरक्षण मिळे पर्यंत माघारी जाणार नाही जरांगे नी सरकारला सुनावले खडेबोल ;आझाद मैदाना बाबतचा निर्णय उद्या दुपारी १२ वाजे पर्यंत घेणार 

0

मुंबई,वाशी,२६ जानेवारी २०२४-  आज २६ जानेवारीचा मान ठेऊन मुंबईला आझाद मैदानावर जात नाही. पण आज रात्री पर्यंत अध्यादेश मिळावा तो पर्यंत इथून हलणार नाही असे प्रतिपादन मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी समाजाचे नेते मनोज जरांगे  पाटील यांनी वाशी येथे जाहीर सभेत सांगितले. ते पुढे म्हणाले अध्यादेश मिळाला नाही तर उद्या मात्र आझाद मैदानावर जाणारच असे ही जरांगे यांनी सांगितले.

आतापर्यंत ३७ लाख नोंदींना प्रमाणपत्र मिळाल्याची माहिती शासनाने दिली आहे. पण, सगेसोयऱ्यांच्या निर्णयाचा अध्यादेश रात्रीपर्यंत काढा. तोपर्यंत मी इथून हलणार नाही. उद्या १२ वाजेपर्यंत अध्यादेश न काढल्यास आझाद मैदानात जाणार, असा स्पष्ट इशारा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी दिला आहे. आरक्षण मिळे पर्यंत मराठा समाजाला १०० टक्के शिक्षण मोफत करण्यात यावे. अशी मागणी ही जरांगे यांनी केली आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी समाजाचे नेते मनोज जरांगे  पाटील यांनी आंदोलन मागे घ्यावे यासाठी सरकारकडून जोरदार प्रयत्न सुरु झाले होत अखेर सरकारने मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य  केल्या आहे. दरम्यान याबाबत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने आज मनोज पाटील यांची भेट घेतली.सरकारनं आज एक जीआर काढला तो जरांगे पाटील यांच्याकडे पोहोचवण्यात आला त्यानंतर जरांगे यांनी सभेत झालेल्या चर्चे बाबत माहिती दिली.

जरांगे म्हणाले की, सरकारशी चर्चा झाली तरी त्यांचे मंत्री कुणीही आले नव्हते. त्यांचे सचिव आपल्यापर्यंत आले होते. मराठ्यांच्या जर ५४ लाख नोंदी सापडल्या असतील तर ते प्रमाणपत्र तुम्ही वाटा. त्या नोंदीत नेमकी नोंद कुणाची हे जाणून घेण्यासाठी संबंधित कागदपत्रे शोधावी. जर ती मिळाली तर अर्ज करता येतील. त्यासाठी ग्रामपंचायतीतर्फे शिबिरं घ्या. गावागावात शिबीरं सुरू करून नोंदी ग्रामपंचायतींकडे जमा करा. आता ५४ लाख नोंदींनुसार त्यांना प्रमाणपत्र मिळतील हे ग्राह्य धरू. ज्या नोंदी मिळाल्यात त्या नोंदी मिळालेल्या सगळ्या कुटुंबाला दिल्या पाहिजेत. त्याच्या कुटुंबाला देखील त्याच नोंदीच्या आधारावर प्रमाणपत्र मिळावं. एका नोंदीवर सरासरी पाच जणांना लाभ मिळाला तरी २ कोटी मराठा समाजाला आरक्षण मिळेल,असं जरांगे म्हणाले.

‘सर्वोच्च न्यायालयात जे आरक्षणासंदर्भात क्युरेटिव्ह पिटीशनचा निर्णय लागेपर्यंत आणि एखादा सगासोयरा सुटला तर सर्व मराठा समाजाला १०० टक्के शिक्षण मोफत करण्यात यावं. हे आरक्षण मिळेपर्यंत सरकारी नोकऱ्यांच्या भरती करायची नाही. जर करायच्या असतील तर मराठा समाजाला राखीव जागा हव्यात या मागणीसाठी राज्यातील मुलींना केजी टू पीजी मोफत शिक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मागण्या मान्य केल्या असतील तर शासन निर्णय काढा, अशी मागणी जरांगे  पाटील यांनी केली आहे.

आज रात्री वकिलांसोबत बसून चर्चा करतो. पण, सगेसोयऱ्यांच्या बाबत रात्रीपर्यंत अध्यादेश काढा. तोपर्यंत मी इथून हलणार नाही. हवं असेल तर आजची रात्र इथे वाशीतच थांबू पण, अध्यादेश काढा. उद्या १२ वाजेपर्यंत अध्यादेश काढला तर गुलाल उधळायला नाहीतर आमरण उपोषण करायला आझाद मैदानात जाणारच, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी समाजाचे नेते मनोज जरांगे  पाटील यांनी २० जानेवारीपासून जालन्याहून मुंबईच्या दिशेने प्रवास सुरू केला होता. आज यात्रेच्या सातव्या दिवशी जरांगे  पाटील आपल्या हजारो समर्थकांसह नवी मुंबईतील वाशी येथे पोहचल्या नंतर वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आपल्या समर्थकांसह जाहीर सभा घेतली.या सभेत मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले

मनोज जरांगे काय म्हणाले 
५४ लाख लोकांपैकी आता पर्यंत ३७ लाख लोकांना प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले आहे.असे सरकारने संगितले
आंतरवली सह सर्व गुन्हे मागे घेणार असे सांगतले असले तरी त्याचे अद्याप पत्र मिळाले नाही. ते पत्र तातडीने मिळावे.
आरक्षण मिळे पर्यंत मराठा समाजाला १०० टक्के शिक्षण मोफत करण्यात यावे.
सरकारला  नोकर भरती कराची असल्यास ती करू नये आणि करायच्या असल्यास मराठा समाजाच्या जागा राखीव ठेऊन भरती करावी
शिंदे समितीला २ महिन्यासाठी मुदत वाढ
शपथ पत्रासाठी स्टॅम्प पेपर मोफत मिळावा

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.