मालेगावमध्ये वर्षभरात तब्बल ३१९ कोटींची वीजचोरी

0

नाशिक,दि,३१ जानेवारी २०२४ –नाशिकच्या मालेगाव मध्ये तब्बल ३१९ कोटी रुपयांची वीजचोरी झाल्याचे उघड झाले आहे.मालेगावातील पॉवर सप्लाय लिमिटेड या खासगी विद्युत कंपनीद्वारे गेल्या वर्षभरात भरारी पथकाकडून प्लास्टिक कारखाने, पावरलुम व घरगुती वापरासाठी वीजचोरी केलेल्यांच्या कारवाईत  वीजचोरी झाल्याचे उघड झाले आहे.मालेगाव शहरात सव्वा लाख वीज ग्राहक असून, पैकी सुमारे ८७ हजार ग्राहक हे मालेगाव मध्य विधानसभा क्षेत्रात आहेत. तर 38 हजार ग्राहक हे मालेगाव बाह्य मतदारसंघातील आहेत.

मालेगाव शहरात सव्वा लाख वीज ग्राहक असून, पैकी सुमारे 87 हजार ग्राहक हे मालेगाव मध्य विधानसभा क्षेत्रात आहेत. तर 38 हजार ग्राहक हे मालेगाव बाह्य मतदारसंघातील आहेत. गेल्या तीन वर्षांत ७१०० वीजचोरीच्या कारवाया झाल्या आहेत. यामध्ये शंभराहून अधिक अवैध प्लास्टिक कारखाने पॉवर लूम व घरगुती ग्राहकांकडून देखील वीजचोरी होत आहे. आतापर्यंत केवळ २८५ जणांवर फिर्याद दाखल झालेली आहे.दरम्यान, वर्षाला तब्बल ३१९ कोटी रुपयांचे होत असलेले नुकसान कसे भरून निघणार ?असा प्रश्न कंपनी समोर निर्माण झाला आहे. .पोलिस यंत्रणेचे सहकार्य योग्य प्रकारे मिळत नसल्याने वीज कंपनीच अडचणीत आली

दरम्यान, या कारवाईत धक्कादायक बाबी उघड झाल्या असून मालेगावात हरित लवादाच्या आदेशाने प्लास्टिक गिट्टीचे सिल केलेले कारखाने परस्पर त्याच ठिकाणी पुन्हा सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हरित लवादाच्या आदेशाचे उल्लंघन झाल्याने मालेगावातील सामाजिक कार्यकर्त्यांनी मात्र याबाबत नाराजी व्यक्त केली असून महानगर पालिका, मालेगाव पोलीस आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या विरोधात याचिका दाखल करण्याची मागणी केली आहे.एकूणच, मालेगाव शहरातील विजचोरीचे प्रमाण तब्बल ४० टक्के असून वीजचोरी केल्यामुळे ग्राहक अडचणीत सापडला नसून वीज पुरवणारी कंपनीच अडचणीत सापडली आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.