बाबाज थिएटर्स तर्फे आज “लता स्वरसुमनांजली”

नाशिकमधील ११ गायिका सादर करणार लता दिदींनी अजरामर केलेल्या मराठी हृदयस्पर्शी गाण्यांचे सादरीकरण

0

नाशिक,दि,६ फेब्रुवारी २०२४ –  बाबाज थिएटर्स व अक्षय ऊर्जा फाउंडेशन संयुक्त विद्यमाने सर्व नाशिककर रसिकांसाठी खास व भारतरत्न लता मंगेशकर यांच्या द्वितीय स्मृतिदिनी लता दिदींच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी “लता स्वरसुमनांजली” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.नाशिकमधील प्रथितयश ११ गायिका गंगापूर नाका येथील कुर्तकोटी सभागृह, शंकराचार्य न्यास येथे आज सायंकाळी ६ वाजता  लता दिदींनी अजरामर केलेल्या मराठी हृदयस्पर्शी गाण्यांचे सादरीकरण करणार आहेत.

गेलीस कुठे तू दूर… हृदयात सोडूनी सूर… या कार्यक्रमाची संकल्पना प्रशांत जुन्नरे यांची असून या कार्यक्रमाचे वाद्यवृंद संयोजन अमोल पाळेकर करणार असून, यात मीना निकम, श्रेयसी राय, नमिता राजहंस, प्राजक्ता गोसावी, आरती पिंपळकर, सुरभी गौड, प्रियांका कोठावदे, रेणुका बायस, सुवर्णा भालेराव, अनुजा देवरे व अलिशा निमोणकर आपल्या सुरेल आवाजाने लता दिदींनी स्वरवंदना अर्पण करतील. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिल्पा फासे करणार असून अमोल पाळेकर, आनंद अत्रे, जयेश भालेराव, सुशील केदारे व प्रवीण मुळे साथसंगत करतील व ध्वनी संयोजन सचिन तिडके यांचे असेल.

नाशिककर रसिकांना मंगेशकर कुटुंबीय व बाबाज थिएटर्सचे प्रशांत जुन्नरे यांचे जिव्हाळ्याचे ऋणानुबंध माहिती आहेतच, त्या अनुषंगानेच आम्ही नाशिकमधील ख्यातनाम ११ गायिकांना अंतर्भूत करून लता दिदींनी अजरामर केलेली दर्जेदार मराठी गाणी सादर करण्याचे शिवधनुष्य पेलत आहोत. या कार्यक्रमात श्री.अनिल दादा जाधव, संस्थापक अध्यक्ष अक्षय ऊर्जा फाऊंडेशन यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

हा कार्यक्रम कुर्तकोटी सभागृह, शंकराचार्य न्यास, गंगापूर रोड, नाशिक येथे संध्याकाळी ६ ते ९ या वेळेत आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य असणार आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.