नवीदिल्ली,दि.६ फेब्रुवारी २०२४ –दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.केजरीवालांच्या मागे ईडी हात धुवून मागे लागली आहे.याचं कारण म्हणजे दिल्लीतील केजरीवालांच्या निकटवर्तीयांकडे १० ठिकाणी ईडीने छापेमारी केली आहे.मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीकडून आप नेत्यांच्या घरावर छापेमारी करण्यात आली आहे.
आपचे राज्यसभा खासदार एन.डी.गुप्ता यांच्या घरावर तसेच अरविंद केजरीवालांचे खासगी सचिव विभव कुमारयांच्या घरावर देखील ईडीकडून छापा टाकण्यात आला आहे. याशिवाय दिल्ली जल बोर्डाचे माजी मेंबर शलभ यांच्या निवासस्थानी देखील छापे टाकले जात आहेत. मनी लाँड्रिंगप्रकरणी अंमलबजावणी संचालनालय सातत्याने कारवाई करत आहे.
आज या प्रकरणी ईडीने आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांचे खाजगी सचिव आणि आम आदमी पार्टीशी संबंधित बड्या नेत्यांच्या घरांवर छापेमारी केली आहे.ईडी सुमारे १० ठिकाणी छापेमारी करत शोध घेत आहे.