अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरणी पोलिसांनी दोघांना घेतलं ताब्यात

चौकशीतून अनेक गोष्टींचा खुलासा होण्याची शक्यता

0

मुंबई,दि,९ फेब्रुवारी २०२४ – शिवसेना ठाकरे गटाचे नेते मुंबईचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची काल गोळी  झाडून हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.मॉरिस नोरोन्हा नावाच्या व्यक्तीने अभिषेक घोसाळकर यांच्यावर एकामागून एक पाच गोळ्या झाडल्या होत्या.त्यातच घोसाळकर यांचा मृत्यू झाला दरम्यान या प्रकरणी आता मुंबई पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे.

मॉरिस नोरोन्हा याचा पीए मेहुल पारीख आणि रोहित साहू असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावं आहेत. विशेष म्हणजे गोळीबार जेव्हा झाला त्यावेळी मेहुल पारीख देखील घटनास्थळी उपस्थित असल्याचे बोलले जात असून, तसा उल्लेख फेसबुक लाईव्हमध्ये घोसाळकर यांची हत्या करणाऱ्या मॉरिस नोरोन्हा याने केला होता.तर,मुंबईच्या एमएचबी पोलिसांनी १ पिस्टल आणि २ जिवंत काडतुसे देखील जप्त केली आहे.

घोसाळकर यांच्यावर गोळीबार करण्यापूर्वी नेमकं काय घडलं, हत्या करण्याचे काय कारण ?, घोसाळकर आणि मॉरिसमध्ये नेमका कोणता वाद होता ? या सर्व प्रकरणाचा पोलिसांकडून आता तपास केला जात आहे. मॉरिस नोरोन्हा याचा पीए मेहुल पारीखच्या चौकशीतून अनेक गोष्टींचा खुलासा होण्याची देखील शक्यता आहे.

अभिषेक घोसाळकरांच्या हत्येप्रकरणी पोलिसांकडून कलम ३०२ नुसार हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तथाकथित सामाजिक कार्यकर्ता मॉरिस नरोना विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून पिस्तूल जप्त केली असून, ही परदेशी बनावटीची पिस्तूल आहे. विशेष म्हणजे मॉरिसकडे पिस्तुलाचा परवाना देखील नव्हता. एमएचबी पोलिसांकडून हा गुन्हा आता गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी घेतली माहिती
अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरणाची दखल गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असून,घडलेल्या सर्व प्रकरणाची माहिती त्यांनी पोलिसांकडून घेतली आहे. नेमकं प्रकरण काय होतं आणि कोणत्या वादातून घडलं याची माहिती फडणवीस यांनी पोलिसांकडून घेतली आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.