नवी दिल्ली, दि,१९ फेबुवारी २०२४ – नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या कारला नवी दिल्लीमध्ये भीषण अपघात झाला आहे. राजधानी दिल्ली मध्ये संसद भवन मधील शिवजयंती कार्यक्रम संपन्न करून नवी दिल्लीतील शासकीय निवासस्थानाकडे येत असतांना त्यांच्या कारला बी डी मार्गावर अपघात झाल्याचं समोर आहे. या अपघातमध्ये हेमंत गोडसे थोडक्यात बचावले आहेत. सुदैवाने या अपघातात हेमंत गोडसे यांना मोठी दुखापत झाली नाही. मात्र त्यांच्या गाडीचे मोठे नुकसान झालं आहे. अपघाताचं कारण अद्याप समोर आलेले नाही.
अपघात इतका भीषण होता की त्यांच्या कारचा अक्षरश: चक्काचूर झाला. सुदैवाने हेमंत गोडसे यांना मोठी दुखापत झालेली नाही. या भीषण अपघातातून हेमंत गोडसे बचावले आहेत. गोडसे यांच्याशिवाय त्यांच्यासोबत असणारे सहकारीही सुरक्षित आहेत. मात्र त्यांच्या गाडीचं मोठं नुकसान झाल्याची माहिती आहे.
हेमंत गोडसे दिल्लीतील बी डी मार्गावरुन जात होते. ते इनोव्हा MH 15 FC 9909 या गाडीने प्रवास करत होते. त्यावेळी त्यांच्या गाडीला पाठीमागून आर्टिका डीएल 7CW 2202 या गाडीने जोरदार धडक दिली. यामध्ये हेमंत गोडसे यांच्या गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. सुदैवानं या अपघातामध्ये कुणालाही मोठी दुखापत झाली नाही. राज्यसह देशभरात आज शिवजयंतीचा उत्साह आहे. राजधानी दिल्लीतही शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलं आहे. याच कार्यक्रमातून परत येत असतांना हा अपघात झाला अशी प्रार्थमिक माहिती आहे.