मुंबई,दि,२७ मार्च २०२४ –नाशिक लोकसभा मतदारसंघात मोठा ट्विस्ट आला आहे. कारण एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांनी खासदार हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर केली असताना, तिकडे छगन भुजबळ हेच महायुतीचे उमेदवार असतील हे समोर आलं आहे.या बाबत उद्या घोषणा होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.हि जागा राष्ट्रवादी काँग्रेसनेलढवावी असे आजच्या बैठकीत ठरले आहे असे खुद्द छगन भुजबळ यांनीच पत्रकारांना सांगितले उमदेवार कोण असेल हे पक्ष ठरवेल असं ही भुजबळ म्हणत असले तरी नाशिक लोकसभा मतदार संघातून महायुतीकडून भुजबळांचे नाव निश्चित झाले असल्याचे सूत्रांनी सांगितले.
नाशिक लोकसभेबाबात महायुतीतील शिवसेना आणि भाजप यांच्यात चढाओढ सुरु होती.नाशिक लोकसभा निवडणुकीची जागा महायुतीच्या शिंदे गटाकडे असणार अशी चर्चा असतांना हि जागा भाजपाला मिळावी यासाठी भाजपा कार्यकर्त्यांनी पक्षश्रेष्ठीकडे मागणी केली मात्र आता छगन भुजबळ यांच्या नावावर एकमत झालं असून, त्यांच्याच नावावर शिक्कामोर्तब झालं आहे.नाशिकच्या जागेसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये चढाओढ सुरु होती. मात्र त्यात राष्ट्रवादी काँग्रेसनं बाजी मारल्याचं चित्र आहे