नाशिक:आपल्या घराचे स्वप्न पूर्ण होणार क्रेडाई ‘रिजनल प्रॉपर्टी महोत्सवाचे आयोजन 

६ व ७ एप्रिल रोजी दिवस ५ विविध ठिकाणी गृह प्रदर्शन :१५ लाख रुपयांपासून ४ कोटी रुपयांपर्यंत पर्याय उपलब्ध

0

नाशिक,दि,४ एप्रिल २०२४ –अगदी १५ लाख रुपयांपासून ४ कोटी रुपयांपर्यंत घरांचे विविध पर्याय उपलब्ध असणाऱ्या क्रेडाई नाशिक मेट्रो च्या ६ व ७ एप्रिल रोजी आयोजित ‘रिजनल प्रॉपर्टी महोत्सव या गृह प्रदर्शनाची  तयारी पूर्णत्वास येत आहे. या वेळी हे प्रदर्शन वरील दोन दिवसात नाशिक शहरातील ५ विविध लोकेशन ला आयोजित करण्यात आले असल्याची माहिती क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष कृणाल पाटील यांनी दिली.

ही प्रदर्शने शहरातील  गंगापूर रोड येथील वृन्दावन लॉन्स ,दिंडोरी रोडवरील पवार लॉन्स,पंचवटीजवळील स्वामी नारायण हॉल,गोविंदनगर येथील मनोहर गार्डन व नाशिक रोड येथील इच्छामणी  लॉन्स येथे होणार असून सुमारे १५० हून अधिक विकसक यात सहभागी होणार आहेत. या मध्ये त्या त्या भागातील प्रॉपर्टी ची माहिती ग्राहकांना मिळणार असून या मुळे पसंतीच्या भागात घर घेणे ग्राहकांना अधिक सोपे होणार आहे असेही कुणाल पाटील म्हणाले.

नाशिक मधील घर खरेदी चा ट्रेंड अन्य शहरांपेक्षा बराच वेगळा आहे .नाशिक मध्ये सर्वच प्रकारच्या घरांना मागणी आहे. यामध्ये अगदी बजेट हाऊसिंग पासून  ते प्रीमियम घरे यांचा समावेश आहे. वाढत्या पारिवारिक गरजांनुसार अपग्रेडेशन कडे पण ग्राहकांचा कल आहे .शहरात अनेक आघाडीच्या शैक्षणिक संस्था असून त्या मुळे स्टुडन्ट हौसिंग ला मागणी येत असून  सीनियर सिटीजन हाऊसिंग हे एक नवे क्षेत्र देखील नाशिक मध्ये उदयास आले असल्याचे प्रदर्शनाचे समन्वयक नरेंद्र कुलकर्णी हे म्हणाले.

एकच शहरात विविध ठिकाणी सारख्या तारखांना आयोजित होणारे हे भारतातील पहिलेच प्रदर्शन असून गुढीपाडवा आणि अक्षय तृतीया या  गृहखरेदी साठी  असलेल्या मोठ्या  मुहूर्ताच्या आधी आयोजित या गृह  प्रदर्शनाने  या सणासुदीला अनेकांचे गृह स्वप्न पूर्ण होईल .या प्रदर्शनात फ्लॅट ,रो-हाउस,शॉप्स,फार्म हाउस ,प्लॉट असे पर्याय उपलब्ध असून आघाडीच्या गृहवित्त सहाय्य देणाऱ्या वित्तीय संस्थांचा देखील या प्रदर्शनात सहभाग राहील. प्रदर्शनाची वेळ सकाळी १० ते रात्री ९ अशी आहे .तसेच प्रदर्शनास प्रवेश मोफत आहे.

प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी  सर्व माजी अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली सहसमन्वयक  सचिन बागड , विजय चव्हाणके,अनंत ठाकरे,सतीश मोरे व शिवम पटेल  तसेच  मानद सचिव गौरव ठक्कर , उपाध्यक्ष सुजॉय  गुप्ता ,दीपक बागड, जयंत भातंबरेकर, खजिनदार हितेश पोद्दार, सहसचिव अनिल आहेर, ऋषिकेश कोते, कमिटी सदस्य मनोज खिवसरा ,श्रेणिक सुराणा ,हंसराज देशमुख, नितीन पाटील ,श्याम साबळे ,अतुल शिंदे, सागर शहा, निशित अटल ,सुशील बागड, सचिन चव्हाण, तुषार संकलेचा,  करण शहा आदी परिश्रम घेत आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.